धुळे । dhule प्रतिनिधी
दीपोत्सव (festival of lights) अर्थात अंधार भेदून प्रकाशाकडे घेऊन (Through the darkness into the light) जाण्याचा संदेश देणारा सण. हाच संदेश देण्यासाठी शहराच्या मोहाडी उपनगरातील (Mohadi suburb) श्री.पिंपळादेवी विद्यालयाच्या (Shree Pimpladevi Vidyalaya) नेटबॉल खेळाडूंनी (netball players) मैदानावर साडेसहाशे पणत्या, दिवे (Six and a half hundred Panatyas) लावून मैदान (field) प्रकाशमय (field is bright) केले. विशेष म्हणजे खेळाडूंनी जिल्हा व विविध शहरातील राज्यस्पर्धेत पटकविलेले पारितोषिकांसह यंदाचा दीपोत्सव साजरा केला.
यावेळी मैदानाचे पुजन संस्थाध्यक्ष विनायक शिंदे, संचालक आकाश शिंदे, महेंद्र देवरे, क्रीडा शिक्षक राजेंद्र शिंदे, हौशी नेटबॉलचे सचिव योगेश वाघ, महानगर खो-खोचे सहसचिव अविनाश वाघ, नेटबॉल प्रशिक्षक ऋत्विक ठाकरे, हर्षल भदाणे, वैशाली पांचाळ, शितल भालेराव, दिलीप साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू, दिव्येश पाटील, अभिषेक शिंदे, राहूल खैरनार, चेतन पाटील, आदित्य दहातोंडे, द्वारकाधिश माळे, सनी जाधव, भविष्य वाघ, कृष्णा गावडे, गितांजली खैरनार, साक्षी पाटील, दिपाली शिंदे, आदी उपस्थित होते.
या अनोख्या दीपोत्सवाचे संयोजन जिल्हा हौशी नेटबॉलचे खेळाडू पियुष गोसावी, संकेत करंदीकर, कार्तिक रेवाळे,निलेश राजपुत, विवेक ठाकूर, विवेक पाटील, निवृत्ती गावडे, निरज साव, प्रेमराज देवरे, कार्तिक वाघ, ऋतुजा धापटे, ऋतुजा आव्हाड, कल्याणी पवार, कावेरी पाटील, वैभवी खैरनार, हर्षाली पाटील, रोशनी सुर्यवंशी, पुर्वश्री वाघ, रिध्दी गावडे, ऋतुजा वाघ आदींनी केले.