धुळे । dhule । प्रतिनिधी
जिल्ह्यातील आत्महत्येची (suicide) परिस्थिती भयावह (Scary) आहे. असे असतांना पालकमंत्री (Guardian Minister) मात्र शहरात दोन दिवस मुक्कामी राहुन फोडाफोडीचे राजकारण (politics of extortion)करतात. जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवतात. मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत (Regarding farmers’ questions) बोलत नाहीत. त्यामुळे आताचे सरकार हे शेतकरी विरोधी (government is anti-farmer) असून त्यातील मंत्र्यांना सत्तेचा (Power to ministers) माज आलेला आहे, असा घणाघात आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांनी शिंदे सरकारवर केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज धुळे जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिरपूर व शिंदखेडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याबरोबरच धुळे तालुक्यातील वडणे, निकुंभ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला पत्रकाराशी संवाद साधला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंके, माजी आ. शरद पाटील, हिलाल माळी, भगवान करनकाळ, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ.सुशिल महाजन आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. दानवे यांनी सांगितले की, विदर्भानंतर धुळे जिल्ह्यात सर्वांधिक आत्महत्या झाल्या आहेत. मात्र आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
अतिवृष्टीच्या पहिल्या टप्प्यात शेतकर्यांना मदत मिळाली असती तर आत्महत्याचे प्रमाण कमी राहिले असते. मात्र या सरकारला अजून किती शेतकर्यांचे जीव हवे आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान पिकविमा ही लुटणारी योजना आहे. त्यात केंद्र व राज्य सरकारचा 96 टक्के वाटा असतो. मात्र शेतकर्यांचा जेवढा वाटा आहे. तेव्हीही मदत योजनेतून शेतकर्यांना झालेली नाही. त्यामुळे योजनेतून केवळ विमा कंपन्यांचे हित होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात आदिवासींना दबावाखाली ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे. धुळे जिल्ह्यातही तशीच स्थिती आहे. राजकीय लोकांचा त्यांच्यावर दबाव असून त्यांच्याकडून आदिवासींना धमक्या दिल्या जात आहेत. त्याबाबत आवाज उठविणार असल्याचेही श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.