Friday, May 17, 2024
Homeधुळेलसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा गणेश मंडळापर्यंत पोहचणार

लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा गणेश मंडळापर्यंत पोहचणार

धुळे । Dhule प्रतिनिधी

बुस्टर डोससाठी (Booster dose) पात्र नागरिकांवर (citizens) आरोग्य यंत्रणेने लक्ष (Attention by the health system) केंद्रीत केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यान आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी (vaccination) थेट गणेश मंडळापर्यंत (Ganesha Mandal) पोहचणार आहे.

- Advertisement -

गणेश मंडळाच्या ठिकाणी लसीकरणाविषयी जनजागृतीसह लसीकरण शिबीर घेतले जाणार आहे. दरम्यान बूस्टरसाठी आता कॉर्बोव्हॅक्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत कार्बोव्हॅक्स ही लस फक्त विद्यार्थ्यांना दिली जात होती. यापूर्वी कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेणार्‍यांना कॉर्बोव्हॅक्सचा घेता येणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. प्रसन्ना कुलकर्णी यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रत्येकाने किमान एक डोस घ्यावा, यासाठी आरोग्य विभागाकडून हरघर दस्तक मोहिम सुरु आहे. विविध माध्यमातून नागरीकांना लसीकरणासाठी प्रेरित केले जात आहे. आरोग्य यंत्रणा थेट शेताच्या बांधावर जाऊन लसीकरण करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही लसीकरण झाले. तसेच शुक्रवारी शिरपूर शहरात दहिंहडीच्या ठिकाणी लसीकरण शिबीर घेण्यात आले.

गणेशोत्सवही जवळ आला आहे. गणेशोत्सवात आरास पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. ही बाब लक्षात घेऊन गणेश मंडळाच्या ठिकाणी लसीकरणाविषयी प्रबोधन करण्यासह लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी गणेश मंडळाची मदत घेतली जाईल. लसीकरण शिबिरासाठी गणेश मंडळानी आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी. गणेश मंडळाच्या मागणीनुसार स्वतंत्र पथक आणि लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चार लाख नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही

कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात 18 लाख 97 हजार 677 नागरीक पात्र आहे. त्यापैकी आतापर्यंत 14 लाख 99 हजार 55 नागरिकांनी पहिला तर 12 लाख 35 हजार 483 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप 3 लाख 98 हजार 22 नागरिकांनी एकही तर 2 लाख 80 हजार 378 नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही.

सव्वा लाख नागरिकांनी घेतला बुस्टर

जिल्ह्यात बुस्टर डोससाठी 8 लाख 90 हजार 886 नागरीक पात्र आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 30 हजार 665 नागरीकांनी बुस्टर घेतला आहे. त्यात 18 ते 44 वयोगटातील 33 हजार 185, 45 ते 60 वयोगटातील 28 हजार 962 तर 60 वर्षावरील 48 हजार 664 नागरिकांचा समावेश आहे. तसेच 6 हजार 678 आरोग्य कर्मचारी आणि 13 हजार 176 फ्रंट लाईन वर्करने बुस्टर घेतला आहे. दरम्यान बुस्टर डोस 30 सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या