Sunday, June 14, 2026
Homeक्रीडाKavya Maran Abrar Ahmed: अबरार अहमदवरुन काव्या मारनची सफाई, पण सनरायझर्सवर मोठी...

Kavya Maran Abrar Ahmed: अबरार अहमदवरुन काव्या मारनची सफाई, पण सनरायझर्सवर मोठी कारवाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
IPL 2026 चा सीझन सुरू होण्यापूर्वीच सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन मोठ्या वादात सापडली आहे. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं, ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. ‘द हंड्रेड’ मध्ये पहिल्यांदाच लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम देऊन पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतलं होतं. तेव्हापासून काव्या मारनवर जोरदार टीका करण्यात येत आहे. सनरायझर्सच्या या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काव्या मारनवर मोठी टीका होताना दिसतीये. अशातच काव्याला मोठा धक्का बसलाय.

सनरायजर्सकडून निवेदन जारी
द हंड्रेडमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्यामुळे काव्या मारन आणि सनरायजर्स लीड्सवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढून टाका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, सनरायझर्स लीड्सची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सनरायझर्स लीड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीने एक निवेदन जारी केले आहे.

- Advertisement -

अबरार अहमदच्या गोलंदाजीत प्रचंड विविधता-डॅनियल व्हेटोरी
अबरार अहमदला संघात घेण्याच्या आपल्या निर्णयाबाबत सनरायझर्स लीड्सने एक निवेदनही जारी केले. सनरायझर्स लीड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीने म्हटले की, अबरार अहमदच्या गोलंदाजीत प्रचंड विविधता आहे. तसेच इंग्लंडमधील स्थानिक खेळाडूंनी यापूर्वी कधीही त्याचा सामना केलेला नाही. लिलावात उपलब्ध असलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी बोली लावण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीने उतरलो होतो. जेव्हा हा पर्याय आमच्यासाठी उपलब्ध झाला, त्यावेळी अनेक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाज संभाव्य निवडीसाठी उपलब्ध होते. परंतु आमची प्राथमिकता अबरार अहमदला आमच्या संघात घेणे हीच होती, असं डॅनियल व्हेटोरीने स्पष्ट केले.

मोजतबा खामेनींची प्रकृती चिंताजनक? एक पाय गमावल्याचा दावा, इराणच्या सुप्रीम लिडरसंदर्भात खळबळजनक दावा

मोठ्या रकमेत खरेदी केले
सनराझर्सने अबरारला 255,000 डॉलर्सच्या या मोठ्या रकमेत खरेदी केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर काव्या मारनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. काव्याने बीसीसीआयचा अलिखित नियम मोडलाय, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. लिलावाच्या टेबलवर मुख्य कोच डॅनियल व्हिटोरी याच्यासोबत काव्या मारन देखील होती. त्यावेळी तिने विरोध का केला नाही? असा सवाल विचारला जातोय.

सनरायजर्सला मोठा धक्का
या निर्णयापासूनच काव्या मारन आणि तिच्या फ्रँचायजीवर जोरदार टीका होताना दिसत असून लोकांनी काव्या मारनला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. त्यातच या फ्रँचायझीचे सोशल मीडिया अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आले आहे. लिलावात अबरारच्या खरेदीवरून वाद निर्माण झाल्यानंतर काही तासांतच, सनरायझर्स लीड्सचे ‘X’ अकाउंट निलंबित करण्यात आले. X च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे, असे फ्रँचायझीच्या अकाऊंटवर नमूद करण्यात आले आहे. मात्र नेमक्या कोणत्या नियमाचे उल्लंघन झाले आणि अकाऊंट का सस्पेंड केले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...