Friday, April 25, 2025
Homeक्रीडाखो-खो विश्वचषकाचा आनंद द्विगुणित; भारतीय महिला खो-खो संघाच्या विजया नंतर पुरुष संघही...

खो-खो विश्वचषकाचा आनंद द्विगुणित; भारतीय महिला खो-खो संघाच्या विजया नंतर पुरुष संघही ठरला विश्वविजेता

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

भारतीय महिला संघापाठोपाठ भारतीय पुरुष संघानेही पहिल्या खो-खो विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेपाळच्या संघाचा पराभव करून इतिहास रचला आहे. अटीतटीच्या सामन्यात नेपाळला हरवून भारताने विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.

- Advertisement -

भारतीय संघाने सुरुवातीला चमकदार कामगिरी केली आणि तिसऱ्या वळणावर 26-18 अशा फरकाने आघाडी घेतली. चौथ्या वळणावर भारतीय संघाने सामन्यातील आपली पकड कायम ठेवत 54-36 ने आघाडी घेत विश्वचषकावर नाव कोरले. याआधी आजच भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० अशा फरकाने पराभव करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

यजमान भारताचा हा आनंद पुरुष संघाने एका तासाच्या कालावधीत द्विगुणित केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...