Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘माय बुक बास्केट’ उपक्रमाची सुरुवात

‘माय बुक बास्केट’ उपक्रमाची सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनाला आनंद देणारा, मनाची मशागत करणारा वाचनासारखा दुसरा मार्ग नाही. वाचन Reading हाच ध्यास असेल तर जीवन निश्चितच समृद्ध होईल. स्वत:ला जाणण्याच्या प्रक्रियेची सुरुवात वाचनाच्या माध्यमातून होते. वाचन हे प्रत्येकाला सुजाण करणारे माध्यम आहे. त्यासाठी ‘माय बुक बास्केट’ सारखे उपक्रम ‘My Book Basket’ campaign ग्रंथालय चळवळीला बळ देणारे आहेत. त्यातून समाजव्यवहाराचे बदलत्या वास्तावाचे भान जपणारी सुसंस्कृत पिढी निर्माण होईल,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका व लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी केले.

- Advertisement -

‘ग्रंथ तुमच्या दारी’ विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माय बुक बास्केट’ या अभिनव योजनेचा शुभारंभ डॉ. भवाळकर यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंंगी डॉ. सुधीर संकलेचा, डॉ.मनोज शिंपी, उपक्रमाचे संकल्पक विनायक रानडे, गायक विवेक केळकर, उद्योजक डी.जे. हंसवाणी उपस्थित होते. स्वागत विश्वास ठाकूर यांनी केले. योजनेच्या समन्वयक दीप्ती जोशी,

विनायक रानडे ,ऋता पंडित यांनी मनोगत व्यक्त केलें. यावेळी दीप्ती जोशी, सुवर्णा यादव, सुनिता पराजपे, तृप्ती बिस्वास, सुप्रिया पुसदकर, कल्पना पाठक, गीता बागुल, पुजा प्रसून, कावेरी रणदिवे, आदि सभासद महिलांचा बास्केट व व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. आभार डॉ. मनोज शिंपी यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या