Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमNashik Crime News : 'त्या' खून प्रकरणातील मुख्य मारेकऱ्यास अटक

Nashik Crime News : ‘त्या’ खून प्रकरणातील मुख्य मारेकऱ्यास अटक

चार महिन्यांनंतर पोलिसांना यश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मुंबई नाक्यावरील (Mumbai Naka) कालिका माता मंदिरामागील सहवासनगरमध्ये एप्रिल महिन्यात घडलेल्या खूनप्रकरणी (Murder Case) संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चार महिन्यांपासून पसार असलेला संशयिताला शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने दिंडाेरीतून अटक केली.

हे देखील वाचा : नाशिकच्या पोलिसांचा गौरव; सात अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक

निलेश सावकार गिते (२४, रा. मोरेमळा, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. १९ एप्रिल २०२४ रोजी रात्री मागील भांडणाची कुरापत काढून संशयित टोळक्याने पीयूष भीमाशंकर जाधव याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात खुनाचा गुन्हा (Case) दाखल आहे. यातील संशयित निलेश गिते हा मात्र तेव्हापासून पसार होता. गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड हे भद्रकाली हददीत गस्तीवर असताना, त्यांना संशयित गिते याची खबर मिळाली.

हे देखील वाचा : PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

गिते परजिल्ह्यात फिरत असून, बुधवारी (दि. १४) तो दिंडोरी येथे मित्राला भेटायला येणार असल्याची खबर मिळताच पथकाने दिंडोरीमध्ये (Dindori) सापळा रचून तळेगाव सबस्टेशन रोडवर अटक केली. पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी (Police) पाठलाग करून त्यास जेरबंद केले. त्यास तपासकामी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : अद्वय हिरेंना दिलासा; नऊ महिन्यांनी तुरुंगातून सुटका

दरम्यान, ही कारवाई गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, सुनील आडके, अशोक आघाव, सुवर्णा गायकवाड यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या