Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्यामहिलेची हत्या करून दागिने चोरणारा अटकेत

महिलेची हत्या करून दागिने चोरणारा अटकेत

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

मुखेड( Mukhed ) शिवारात नवीन कॅनॉल लगत असलेल्या शेतात फिर्यादी वैभव बाळासाहेब आहेर यांची आई शेतीचे काम करीत असतांना अनोळखी आरोपीने उपरण्याने गळा आवळून तिचा खून केला व तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला ग्रामीण पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे.

सदर खूनाचे गुन्हयाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप( District Superintendent of Police Shahaji Umap) यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळास भेट देवून घडल्या परिस्थीतीची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावर फॉरेन्सीक टीम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

पोलीस पथकांनी तपास सुरू करून घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या आरोपीचे वर्णन केल्याप्रमाणे पोलीसांनी पुरावे शोधत निलेश भगवान गिते (वय ३४, रा. महालखेडा,ता. येवला) याला ताब्यात घेतले.त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता,त्याने शनिवारी (दि.२१) सायंकाळी शेतात काम करीत असलेल्या एका महिलेशी झटापट करून तीचा उपरण्याने गळा आवळून जीवे ठार मारले व तीचे गळ्यातील सोन्याची पोत व कानातील कर्णफुले जबरीने चोरून नेले बाबत कबूली दिली असून आरोपीने गुन्हा घडतेवेळी वापरलेले कपडे व मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.

घटनेच्या दिवशी मुखेड गावचा आठवडे बाजार असल्याने यातील आरोपी हा आठवडे बाजारात आला होता. सायंकाळचे सुमारास तो दुचाकीने मुखेड गावचे नवीन कॅनॉल रोडने जात असतांना, त्यास एक महिला शेतात एकटीच काम करत असल्याची दिसली. तेव्हा त्याने शेतात जाऊन सदर महिलेशी झटापट करून तीचा उपरण्याने गळा आवळून जीवे ठार मारले व तीचे अंगावरील सोन्याचे दागीने जबरीने चोरून नेल्याची उघडकीस आले आहे.

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,सपोउनि रविंद्र वानखेडे,नवनाथ सानप,जालिंदर खराटे,विश्वनाथ काकड,नवनाथ वाघमोडे, उदय पाठक,प्रशांत पाटील,नंदू काळे, पोना सागर काकड, प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम,बापू खांडेकर यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत करून सदर खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. खूनाच्या गुन्हयात उत्कृष्टरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या