Thursday, November 21, 2024

तमशा

– वैजयंती सिन्नरकर

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर

- Advertisement -

मुले आता ज्या लोककलेकडे आली होती तिथे गणेशवंदना चालू होती. ती लोककला म्हणजे तमाशा. तमाशात प्रथम श्रीगणेशाची वंदना केली जाते. तमाशा चार भागात किंवा चार अंकात प्रदर्शित केला जातो. गण, गवळण, बतावणी आणि शेवटी वगनृत्य. तमाशा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा आविष्कार आहे. तमाशा हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे. ज्याने तो अरबी भाषेतून घेतला आहे. म्हणजे काही प्रकारचे ‘शो’ किंवा नाट्य मनोरंजन. तमाशा परंपरेविषयीचा संदर्भ मराठी विश्वकोशातही सापडतो. तमाशाचे दोन प्रकार आहेत, ढोलकी भरारी आणि जुना प्रकार संगीत बारी. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी अनेक वगनाट्य, लावण्या, लोकगीते, सवाल जवाब, गण, गवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील प्रमुख तमाशा मंडळांना पुरवले. मुलांनो, तमाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वापरले जातात. ढोलकी हे तमाशातील अत्यंत महत्त्वाचे वाद्य आहे. ढोलकीत कडक फडकतेपणा असून साधारण दोन- सव्वादोन फूट लाकूड पोखरून हे खोड बनवलेले असते.

तुणतुणे – तुणतुणे लाकडी मापट्याला खालच्या तोंडाला कातड्याने मढवून तयार केलेले असते. तुणतुणे वाजवणारा सुरत्या असतो.

हलगी / कडे – हे एक तमाशामधले वाद्य आहे. साधारण मोठ्या ताटाच्या आकाराचे हे वाद्य लाकडी किंवा लोखंडी कड्यावर कातडे मढवून तयार केलेले असते. तमाशात विशिष्ट प्रसंगीच या वाद्याचा उपयोग केला जातो, हलगीच्या खाली तो डाव्या हाताच्या पंजाने आणि बोटात लहान कडी धरून त्या कडीने हलगीवर आघात करून तो हलगी वाजवतो. या हलगीला कडे असेही म्हणतात.

झांज – तमाशातील झांज गोंधळातून तमाशात आली आहे. तुणतुणे वाजवणार्‍या सुरत्याच्या जोडीला दुसरा सुरत्या वाचवत असतो. असा हा लोककलेचा तमाशा हा प्रकार, मुलांनो, हा तुम्हाला आता समजला. चला तर मग पुढ

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या