Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रइर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती ; म्हणाले, यंत्रणा होती, पण...

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती ; म्हणाले, यंत्रणा होती, पण…

मुंबई | Mumbai

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) येथे झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजुनही बचावकार्य सुरू असून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. मात्र आतापर्यंत दुर्दैवाने २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिले.

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, खालापूरजवळील इर्शाळवाडीमध्ये रात्री ११.३५ दरड कोसळली होती. तातडीने तिथे बचाव पथक पाठवली होती. आपली यंत्रणा १२.४० वाजता घटनास्थळी पोहोचली होती. घटनास्थळी NDRFच्या चार टीम पोहोचल्या. स्थानिक बचाव पथकाच्याही पाच टीम आहेत. दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती यांमुळे परिस्थिती कठीण होती. NDRF ४ टीम, अन्य अनेक पथके, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली.गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत तत्काळ घटनास्थळी धावले. ३ वाजता गिरीश महाजन हे प्रत्यक्ष घटना घडली तिथे पोहोचले. अदिती तटकरे, अनिल पाटील हेही पोहोचले, असे शिंदे म्हणाले.

“…तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा”; मणिपूर घटनेवरुन केंद्राची खरडपट्टी काढल्यानं भाजप आमदार संतापले

त्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. गुरूवारी दिवसभरात एकूण ११९ लोकांना वाचवण्यात यश आले. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. आतापर्यंत या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इर्शाळवाडीमध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी काम करत असलेली यंत्रणा जीव ओतून काम करत आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या, वाचलेल्या सर्व लोकांची सोय आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. वाटेत मला अमित शहांचा फोन आला, त्यांनी केंद्र काय मदत करू शकते हे विचारले. तसेच लष्कराची दोन मोठी वजन उचलणारी हेलिक़ॉप्टर तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. याच हेलिकॉप्टरद्वारे आम्ही यंत्र सामुग्री पोहोचवू शकलो आहोत, असे शिंदे म्हणाले.

Video : कावनई किल्ल्याचा काही भाग कोसळला

६०-७० कंटेनर मागविण्यात आले आहेत. त्यापैकी ३० कंटेनर पोहोचले आहेत. यात तेथील ग्रामस्थांची राहण्याची सोय करण्यात येत आहे. तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जागा पाहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. जो पर्यंत त्यांची कायमस्वरूपी सोय होत नाही तोपर्यंत त्यांना मदत केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. सीडकोला त्या ठिकाणी लोकांना कायमस्वरूपी घरं बांधण्याचा आदेश दिला आहे. या लोकांना सर्व त्या सोई उपलब्ध करून देण्यात येतील.

Rain Update : मुंबईसह उपनगरात मुसळधार! सखल भागात पाणी, रेल्वे वाहतूक उशिराने

घटनास्थळी खूपच विदारक स्थिती होती. वरून माती उरकण्यासाठी लोक काम करत होते. परंतू, ढिगारा पाहता आणखी मनुष्यबळ लागणार होते. आम्ही सिडकोशी संपर्क साधला, तिथून शिर्के, एल एँडटी सारख्या कंपन्यांचे सुमारे १००० मजूर फावडा, टिकाव आणि अन्य यंत्रणेसोबत पाठविण्यात आले आणि बचावकार्याला वेग आला, असे शिंदे म्हणाले. हे साहित्य नेणाऱ्यांना सॅल्यूट करायला हवे, असे शिंदे म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या