धुळे Dhule । प्रतिनिधी
घरोघरातील अंगणात पेटलेल्या पणत्या (Burnt in the courtyard), झेंडूच्या फुलांनी दारांवर सजवलेले तोरण (Arch decorated with marigold flowers), अंगणात काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या, (rangoli,) फटाक्यांची (firecrackers,) तुफान आतषबाजी, लक्ष्मींची आराधना (Worship of Lakshmi ) अन् लज्जतदार जेवणाच्या संगतीने दीपोत्सव (festival of lights) व लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) धुळेकरांनी (Celebrated by Dhulekar) साजरा केला.
दीपोत्सवात सर्वात महत्वाचे लक्ष्मी पूजन असते. मांगल्य, आरोग्य धनसंपदा या सार्यांचे एकत्र रूप म्हणजे लक्ष्मी देवता आणि याच कारणाने दीपोत्सवात लक्ष्मींची आराधना केली जाते. लक्ष्मी पूजनासाठी धुळेनगरी सजली होती. लक्ष्मीपूजन हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. सराफ बाजारही आज फुलल्याचे दिसले.
झेंडूच्या फुलांना मागणी- दीपोत्सवात झेंडूच्या फूलांचे तोरण करून लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांना वाढती मागणी दीपोत्सवात असते. यंदा लक्ष्मीपूजनाला 40 ते 50 रुपये दराने फुलांची विक्री झाली. फुले विक्रेत्यांनी काल रात्रीपासूनच तात्पुरता स्वरुपाची दुकाने शहरातील विविध भागात थाटली होती.
सराफ बाजारात गर्दी- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आज सराफ बाजार फुलला होता. लक्ष्मीची मुर्ती व इतर दागिणे खरेदी करण्यावर भर ग्राहकांनी दिला. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सराफ बाजारात गर्दी दिसून आली.
वाहनेखरेदी- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहने खरेदी देखील केली जाते त्यामुळे शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने विक्रीचे शोरूम सजली होती. ग्राहकांनाही वाहने खरेदीसाठी दीपोत्सवानिमित्त खास सवलत देण्यात आलेली होती. ग्राहकांनी अगोदरच वाहने बुक करून ठेवली होती. आज शुभमुहूर्तावर खरेदी केली. दुचाकी वाहनांची विक्रमी विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दुपारपर्यंत लाह्या आणि बत्तासे हा नैवेद्य घेण्यासाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली होती. शहरातील प्रमुख बाजारपेठा व मार्गावर प्रसाद विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. 70 ते 100 रुपयांपर्यंत प्रसादाचे पॅक बाजारात उपलब्ध होते. तसेच नैवद्यासाठी लागणार्या फळांची ही मोठी उलाढाल झाली. लक्ष्मी पूजनासाठी लागणारी देवी प्रतिमा व मुर्तीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. लक्ष्मी पूजनासाठी लागणारी केरसुणीलाही महत्व असल्याने यांचीही खरेदी करण्यात आली.
शुभेच्छांचा पाऊस- दिवाळी निमित्त मित्र व आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. आधुनिक युगात मोबाईलद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे मोबाईल बिजी मिळत होते. अनेक कंपन्यांचे मोबाईल लाईन आज दिवसभर बिजीच होती.
मिठाईचे वाटप- दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणीच. हा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी परस्परांना मिठाईचे वाटप केले जाते. यामुळे शहरातील प्रमुख मिठाईंच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून आली. राजकीय मंडळींनीही दिवाळीचा मुहूर्त साधून आपल्या हितचिंकांना मिठाईचे वाटप केले.
वही पूजन- लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यापारी वही पूजन करतात. पारंपारिक पध्दतीने लक्ष्मीं ची आराधना करून पुरोहितांकडून वही पूजन आज करण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी- लक्षी पुजनानिमित्त शहरात आज फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध बेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने धुळेनगरी न्हाऊन निघाली. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करता आली नाही. यामुळे फटाके उत्पादकांनी वाढविलेल्या किमतीमुळे यंदा किमान 40 टक्क्यांने फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे होलसेल दरात फटाके घेण्यासाठी ग्राहकांनी विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर आणि चक्क शहरा लगतच्या गोडावूनच्या बाहेर देखील मोठी गर्दी केली. यामुळे तासंतास ग्राहक रांगेत उभे असल्याचे आढळून आले.
जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील सर्वच व्यापार्यांनी लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने आपापल्या आस्थापनांमधील साफसफाईची कामे केलीत. त्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत अशाप्रकारच्या साफसफाईची वर्दळ जाणवली. आज महालक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र अनेक दुकांनामध्ये रात्री उशिरा महालक्ष्मी आणि वहिचे पूजन झाल्याचे दिसले.