नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) समाजातील अनेक प्रथा मुळासकट संपवण्याचा ध्यास घेतला आहे. त्या सत्य घटनेवर भाष्य करणारा ‘जोखड’ (Jokhad) हा मराठी चित्रपट (Marathi movie) लवकरच ६ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे….
या चित्रपटाचा औपचरिक मुहूर्त नाशिक येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे (Krishna Chandgude) यांच्या हस्ते करण्यात आला. ए. जी. प्राॅॅडक्शन (A. G. Production) चित्रपटाची निर्मिती करीत आहे तर डॉ. अशोक गावीत्रे (Dr. Ashok Gavitre) दिग्दर्शन करणार आहे.
चित्रपटात विजय पाटकर, सुनील गोडबोले, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा, सैराट फेम तानाजी, संजय खापरे, उषा नाडकर्णी, महेश खैरनार, रोहित सरवार, बाल कलाकार समृद्धी सरवार, चेतन भांडारकर, शिवाजी जाधव, वैष्णवी जाधव, दिव्या जगताप, किरण जाधव, दीपिका तोडकर, प्रसाद भागवत, सचिन बनसोडे, प्रकाश भागवत यांच्या भूमिका असणार आहे.
आदर्श शिंदे (Adarsh Shinde), अवधूत गुप्ते (Avadhut Gupte), वैशाली म्हाडे (Vaishali Mhade) यांच्या आवाजातील संगीत असणार आहे. पटकथा व संवाद लेखन सचिन रा. जाधव (Sachin Jadhav) यांचे असून संकलन कुणाल मेढे (Kunal Medhe) करत आहे.