वैजापूर | दीपक बरकसे | प्रतिनिधी
सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर झाला.
उभ्या ट्रकला खासगी बस धडकली असल्यानं हा अपघात झाला. वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व मयत नाशिक येथील रहिवासी असून मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. नुकतीच मृतांची व जखमींची नावे समोर आली आहेत. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहे. मात्र, समृद्धी महामार्गावर उद्घाटनापासून सातत्यानं अपघात घडत आहेत.
मृतांची नावे-
तनुश्री लखन सोळसे (वय ५)
संगीता विकास अस्वले (वय ४०)
अंजाबाई रमेश जगताप (वय ३८)
रतन जगधने (वय ४५)
कांतल लखन सोळसे (वय ३२)
रजनी गौतम तपासे (वय ३२)
हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०)
झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०)
अमोल झुंबर गांगुर्डे (वय ५०)
सारिका झुंबर गांगुर्डे (४०)
मिलिंद पगारे (वय ५०)
दीपक प्रभाकर केकाने (वय ४७)
जखमींची नावे
पुजा संदीप अस्वले (वय ३५ )
वैष्णवी संदीप अस्वले (वय १२)
ज्योती दिपक केकाणे (वय ३५)
कमलेश दगु म्हस्के (वय ३२)
संदीप रघुनाथ अस्वले (वय ३८)वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक
युवराज विलास साबळे (वय १८)
कमलबाई छबु म्हस्के (वय ७७)
संगीता दगडु म्हस्के (वय ६०)
दगु सुखदेव म्हस्के (वय ५०)
लखन शंकर सोळसे (वय २८)
गिरजेश्वरी संदीप अस्वले (वय १० )
शांताबाई नामदेव म्हस्के (वय ४०)
अनील लहानु साबळे (वय ३२ )
तन्मय लक्ष्मण कांबळे (वय ०८)
सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन (वय २५ )
श्रीहरी दिपक केकाणे (वय १२)
सम्राट दिपक केकाणे (वय ६०)
गौतम भास्कर तपासे (वय ३८ )
कार्तिक लखन सोळशे (वय ५)
धनश्री लखन सोळसे (वय ०८)
संदेश संदीप अस्वले (वय १२)
प्रकाश हरी गांगुर्डे (वय २४)
शंकर (अंदाजे वय ३)