धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रूग्ण संख्या वेगाने वाढत असून आज बाधितांच्या एकुण संख्येने चार हजारांचा आकडा पार केला आहे. दिवसरात नवीन 141 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर करोनाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 139 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील 27 अहवालांपैकी मोहाडी, जय प्रकाश चौक, विद्यानगरी व येवलेकर नगरातील प्रत्येकी एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाडणे साक्री सीसीसीमधील 43 अहवालांपैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात मालपुर 1, निजामपूर 2, विद्यानगर पिंपळनेर 1, सीसीसी भदाणेेतील एक रूग्ण आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 70 अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात संतोषी माता मंदिर 1, मालु नगर 1, महादेवपुरा 2, पाटील गल्ली 4, धमाने 1, विद्यानगर 1, रामी शिंदखेड़ा 1, नवा भोईवाड़ा दोंडाईचा 1, वारुळ शिंदखेड़ा 1, राउळ नगर दोंडाइचा 1, म्हळसर शिंदखेड़ा 1, दाउळ ता. शिंदखेड़ा येथील दोन रूग्णांचा समावेश आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 154 अहवालांपैकी 59 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गजानन कॉलनी 1, विद्याविहार 1, करवंद रोड 1, भुपेश नगर 1, वाल्मिक नगर 1, चंद्र नगरी 1, बापूजी नगर 4, खरे वाडा 5, दूध डेअरी कॉलनी 1, जैन मंदिर मागे 3, दादूसिंग कॉलनी 1, सुदर्शन नगर 3, मारवाडी गल्ली 1, राजपूत वाडा 1, अर्थे 1, आमोदे 1, वरवाडे 1, विखरण 1, करवंद 1, बेटावद 1, वालखेडा ता. शिंदखेडा 2, बोराडी 3, भटाने 1, होळनांथे 1, खर्दे 2, पाटण 1, भोरटेक 1, पळासनेर 1, वाघाडी 1, मांजरोद 3, थाळनेर 6 व शिरपूरातील सहा रूग्ण आहेत.
महापालिका पॉलिकेक्निक सीसीसीमधील अँटीजन टेस्टच्या 64 अहवालांपैकी धुळे शहरातील 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तसेच खाजगी लॅबमधील 46 अहवालापैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात सोनगीर 3, कुसुंबा 7, भगवा चौक 3, आंबेडकर चौक 1, वरखेडे रोड 1, साक्री रोड 1, मिरच्या मारुती चौक 1, 40 गाव रोड 5, वाखारकर नगर 1, दूध डेअरी रोड 1, जव्हार कॉम्प्लेक्स 1, महिंदळे 1, शिरपूर 1 व जळगावील तीन रूग्णांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 26 अहवालांपैकी साक्री, जुने धुळे, भरत नगर व लोकमान्य हॉस्पिटल येथील प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये 6 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 4 हजार 52 एवढील झाली आहे.
पाच जणांचा मृत्यू
कोरोनामुळे आज पाच जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील सीताराम नगरातील 50 वर्षीय पुरुष, दोंडाईचातील 65 वर्षीय पुरुष, धुळ्यातील 61 वर्षीय पुरुष, शिंदखेडा येथील 55 वर्षीय महिला व महिंदळे ता. धुळे येथील महिला करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू होते.