निफाड/खेडलेझुंगे । प्रतिनिधी
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदारसंघात गेली वीस वर्षे भुजबळ पॅटर्नमधून विकासकामे करीत आहोत. त्यामुळे कोणी काहीही बोलले तर आपल्याला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. मतदारसंघाचा विकास करणे हाच आपले एकमेव उद्दिष्ट आहे. पुढील पाच वर्षांत मतदारसंघातील एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिर खेडलेझुंगे येथे नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी योगीराज तुकाराम बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
याप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, माजी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, मायावती पगारे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ,अरुण थोरात, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, डी. के. जगताप, प्रकाश दायमा, सुवर्णा जगताप, येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, भाजप विधानसभा अध्यक्ष आनंद शिंदे, विनोद जोशी, कैलास सोनवणे, शेखर होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, सचिन दराडे, मंगेश गवळी, शिवाजी सुपनर, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, अशोक घोटेकर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सुरेखा नागरे, भाऊसाहेब बोचरे, अशोक नागरे, दत्तात्रय रायते, बालेश जाधव, मच्छिंद्र थोरात, रामभाऊ जगताप,उन्मेष डुंबरे, मायाताई सदाफळ,
बाळासाहेब गुंड, बाळासाहेब पुंड, विजय सदाफळ, प्रशांत घोटेकर, निलेश सालकाडे, माधव जगताप, बबन शिंदे, योगेश साबळे, रोहिदास जाधव, शरद जाधव,उदय आहेर, डॉ.वैशाली पवार, विलास गोरे, संपत डुंबरे, शिवनाथ सदाफळ, देविदास निकम, संतोष राजोळे, विलास गिते, पांडुरंग राऊत, सोहेल मोमीन यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांना वंदन करून भुजबळ यांनी प्रचाराचा आरंभ केला.
छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केला.