Sunday, May 19, 2024
Homeधुळेमनपात साकारणार देशातील एकमेव स्मारक

मनपात साकारणार देशातील एकमेव स्मारक

धुळे । प्रतिनिधी Dhule

महापालिकेत स्मारकाचे उदघाटन रविवारी झाले. यावेळी खा.डॉ.भामरे हे बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, सभापती स्नेहल जाधव, विरोधी पक्ष नेते साबीर शेख, माजी महापौर कल्पना महाले, जयश्री अहिरराव, भिकन वराडे, नागसेन बोरसे, देवेंद्र सोनार आदी उपस्थित होते.

तरूण पिढीला संतांची माहिती व्हावी व प्रेरणा मिळावी, यासाठी मनपाच्या आवारात संतश्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज यांचा भव्य व आकर्षक स्मारक साकारले जाणार आहे. 41 फुटाची उंची असलेले देशातील पहिले स्मारक सर्व समाजासाठी आदर्श ठरणार आहे.

- Advertisement -

खा. डॉ. सुभाष भामरे

यावेळी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या कार्यकाळात शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनतर कल्पना महाले महापौर असतांना पुतळ्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होतो. त्यांनतर माजी महापौर कल्पना महाले याच्या कार्यकाळात प्रस्ताव नुतनीकरण करण्यात आला. त्यासाठी खा.डॉ.सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपा पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले. फेब्रुवारी महिन्यापर्यत या स्मारकाचे काम पुर्णत्वास येईल असेही महापौर सोनार यांनी सांगितले.

सुत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले व आभार प्रकाश बाविस्कर यांनी मानले. यावेळी शक्तीभाई मैती, बबन मोरे, सुनील देवरे, जमनादास सोनार, दीपक वारकर, दिनेश विभांडिक, श्रीकांत बनछोड, प्रमोद मुंडके, सुभाष विसपुते, सुनील विसपुते, जितेंद्र वानखेडे, रविराज चव्हाण, महेंद्र सोनार, सुनील आहिरराव, सुभाष गाळणकर, जीवन सोनवणे, विजय पिंगळे, महेंद्र विसपुते आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या