Friday, May 3, 2024
Homeनगरझेडपीच्या 1 हजार 200 जागांसाठी जानेवारीत सुरू होणार भरती प्रक्रिया

झेडपीच्या 1 हजार 200 जागांसाठी जानेवारीत सुरू होणार भरती प्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कोविडमुळे बंद असणार्‍या जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे.

- Advertisement -

याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश काढले असून त्या आदेशानूसार सध्या रिक्त असणार्‍या जागांच्या 80 टक्के जागांसाठी जानेवारी महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अशा प्रकारे संभाव्या 1 हजार 200 जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने भरतीसाठी तयारी सुरू केली. यासाठी विभागनिहाय बिंदूनामावली तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील आठवड्यापासून प्रत्येक विभागाची बिंदूनामावली (रोस्टरची) नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात तपासणी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाची बिंदूनामावली तपासण्यात येणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 858 आणि 32 या पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. यात सध्या रिक्त असणार्‍या 80 टक्के पदासाठी भरती होणार आहे.

आरोग्य खात्यात आरोग्य सेवक पुरुष आणि महिला (हंगामी कर्मचारी, फवारणी कर्मचारी आणि अन्य कर्मचार्‍यांचा समावेश), औषध निर्माण अधिकारी यांचा आदिवासी भाग (पेसा) आदिवासी भागा बाहेरील ( नॉनपेसा) यांचा समावेश आहे. यासह अन्य विभागातील 341 जागांसाठी भरती होणार आहे. रिक्त जागा आणि भरती होणार्‍या जागांची संख्या ही बिंदूनामावली तपासून झाल्यावर समोर येणार आहे. आता सध्याचे आकडे हे अंदाजे काढण्यात आलेले असले तरी त्यात फारसा फरक पडणार नसल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

असे आहे भरतीचे वेळापत्रक

विभागनिहाय बिंदू नामावली आणि रिक्तपदानूसार आरक्षण निश्‍चित करणे आणि तदनुषंगिक सर्व कामे करणे वेळ अडीच महिने 31 जानेवारी 2023 पर्यंत. पद भरती जाहिरात प्रसिध्द करणे कालावधी 1 आठवडा 1 ते 7 फेब्रुवारी 2023. उमेदवारी अर्ज मागवणे 14 दिवस 8 ते 22 फेब्रुवारी 2023. उमेदवारी अर्जाची छानणी करणे वेळ 1 आठवडा 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023. जिल्हा परिषछ व जिल्हा निवड मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनसंदर्भात कार्यवाही करणे 1 महिना 6 मार्च ते 5 एप्रिल. पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमदेवारांना उपलब्ध करून देणे 1 आठवडा 6 ते 13 एप्रिल 2023. परीक्षेचे आयोजन करणे (ऑनलाईन /ऑफलाईन) 14 ते 30 एप्रिल 2023 आणि अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे 1 महिना 1 ते 31 मे 2023.

- Advertisment -

ताज्या बातम्या