Wednesday, May 29, 2024
Homeधुळेजिल्ह्यातील धार्मिक स्थळे केली चकाचक

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे केली चकाचक

धुळे Dhule । प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. (Chief Executive Officer of Z.P. Bhuvaneshwari S.) यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेतंर्गत (cleanliness drive) काल जिल्ह्यातील धार्मिक स्थळी (religious places) स्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांनी श्रमदान (Shramdan) केले. यावेळी वृक्षरोपणही करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनीसह विद्यार्थ्यांनी देखील उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांच्या संकल्पनेतून आणि अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

काल या मोहिमेचा तिसरा टप्पा होता. नागेश्वर महादेव मंदीर (अजनाड ता.शिरपूर), शिरुड (ता.धुळे) येथील कालिका देवी मंदिर, विमलनाथ जैन मंदिर व प्राचीन हेमाडपंथीय कानुबाई माता मंदिर (बळसाने ता. साक्री) येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

शिरपूर तालुक्यातील अजनाड येथील नागेश्वर महादेव मंदिर व परिसरात सकाळी स्वच्छता मोहीमेला सुरुवात झाली. यावेळी परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात तालुक्यातील अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्रमदान करीत सहभाग नोंदवला.

प्रारंभी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अधिकार्‍यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेसाठी श्रमदान केले तसेच परिसरात असलेले प्लास्टिक गोळा केले. यावेळी मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

या मोहिमेत शिरपूरचे गटविकास अधिकारी संजय सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.गिरासे, गटशिक्षणाधिकारी गायकवाड, सरपंच सौ.सोदराबाई गंगाराम वंजारी, विस्ताराधिकारी सुदाम मोरे, संजय पवार, आर.जे.पावरा, ग्रामसेवक शरद धिवरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

बळसाणे येथेही स्वच्छता अभियान

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती, साक्री आणि ग्रामपंचायत बळसाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तीर्थक्षेत्र ऐतिहासिक स्थळ विमलनाथ जैन मंदिर व प्राचीन हेमाडपंथीय कानुबाई माता मंदिर येथील परिसरात स्वच्छता करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, पं.स सदस्य महावीर जैन, सरपंच दरबारसिंग गिरासे, उपसरपंच मलेखाबी शेख, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश गावित, उप अभियंता श्री.पवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी बनसोडे, बोरसे, कृषी अधिकारी नेतन, विस्ताराधिकारी जगदीश खाडे, पाणीपुरवठा शाखा अभियंता पाटील, शिंदे, ग्रामसेवक एच.डी.देसले तसेच भागातील ग्रामसेवक, प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना स्वच्छतेची शपथ ग्रामसेवक विजय सैंदाणे यांनी दिली.

कालिका देवी मंदिर परिसरात लोकसहभागातून स्वच्छता

शिरूड (ता.धुळे) येथील कालिका देवी मंदीर परिसरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पं.सचे उपसभापती विद्याधर पाटील, गटविकास अधिकारी आर.डी. वाघ, जि.प सदस्य आशुतोष पाटील, पं.स सदस्य दीपक कोतेकर, सरपंच गुलाबराव कोतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. विस्तार अधिकारी भीमराव गरुड, बी.व्ही.पाटील, आर.डी.महिंदळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नांद्रे, ग्रामसेवक भूपेंद्र ठाकूर आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आशापूरी देवी मंदिर परिसरातही राबविली स्वच्छता मोहीम

शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील आशापुरी देवी मंदिर परिसरात बुधवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसरातील स्वच्छतेसाठी अधिकारी कर्मचारी पुढे सरसावल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या श्रमदानातून मंदिर व परिसर चकाचक झाला. यावेळी गटविकास अधिकारी डी.एम.देवरे, संतोष सावकारे, एस.ओ.जाधव, कपिल वाघ यांच्यासह ग्रा.पं सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या