नाशिक | प्रतिनिधी Nashik
कार्यकर्तृत्व, समाजसेवा आणि विविध व्यावसायिक कौशल्यांचा आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविणार्या उदयोन्मुख व्यक्तींचा ‘व्हिएतनाम’च्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘देशदूत’ व ‘सार्वमत’तर्फे ‘रायझिंग स्टार अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा सोहळा दा नांग सिटी येथे उद्या सोमवार दिनांक २८ रोजी होणार आहे.
विविध क्षेत्रातील उदयोन्मुख व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी ‘देशदूत’ माध्यम समूहातर्फे या वर्षापासून ‘रायझिंग स्टार अवॉर्ड’ प्रदान केले जाणार आहेत. वैयक्तिक पातळीवर बिआँड बॉर्डर्स अर्थात देशाच्या सीमेपार गौरविणारा ‘देशदूत’ माध्यम समूहाचा हा पहिलाच पुरस्कार आहे.
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनलेले व आशिया खंडातील ‘युरोप’ म्हणून नावारूपास येऊ लागलेल्या ‘व्हिएतनाम’मधील ‘दा नांग’ या शहरातील समुद्र किनार्यावरील नयनरम्य अशा तारांकित हॉटेलमध्ये ‘रायझिंग स्टार अॅॅवॉर्ड’ सोहळा होत आहे. व्हिएतनाम पर्यटन प्रोत्साहन केंद्राच्या उपसंचालक माई थी थान खास या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
प्रतिष्ठेच्या या सोहळ्यात ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी उपस्थित राहतील.
यांचा होणार गौरव
अॅड. डॉ. वैभव शेटे, नाशिक
डॉ. नीलेश निकम, नाशिक
शंकरराव वाघ, निफाड
जयेश मेहता, मुंबई
सुनील पाटील, दिंडोरी
अमोल देशमुख, दिंडोरी
सोमनाथ सोनवणे, दिंडोरी
प्रतिक क्षत्रिय, सिन्नर
अक्षय रमेश वडनेरे, नाशिक.
अभिजित कृष्णा दुसाने, निफाड
अथर्व चिंतामणी, नाशिक
श्रीरंग खुळे, सिन्नर
वीरेंद्र नानासाहेब थोरात, अकोले,अहिल्यानगर
रावसाहेब वाकचौरे, अकोले, अहिल्यानगर.
गणेश सोपान मैड, लोणी,अहिल्यानगर




