Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबाररोटरी वेलनेस सेंटरने केले हजार रेमडिसिवर इंजेक्शन प्रशासनाला परत

रोटरी वेलनेस सेंटरने केले हजार रेमडिसिवर इंजेक्शन प्रशासनाला परत

नंदुरबार | प्रतिनिधी- Nandurbar

- Advertisement -

नंदुरबार प्रशासनाने रोटरी वेलनेस सेंटरला उसनवारी तत्वावर दिलेले १००० रेमडिसीव्हीर इजेक्शन रोटरी वेलनेस सेंटरतर्फे आज जिल्हा रूग्णालयात जावुन परत करण्यात आले.

रोटरी वेलनेस सेंटरतर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे कि ,नंदुरबार जिल्हयामध्ये कोरोनाचे थैमान वाढले असतांना हजारो रुग्ण आपल्या नातेवाईकाला रेमडिसीव्हीर मिळविण्यासाठी वन-वन फिरत होते.

अश्या परिस्थितीत त्यांना अल्पदरात किंवा शासकिय किंमतीपेक्षा कमी दरात संकट समयी वेळेवर मदत करण्याचे रोटरी वेलनेस सेंटरचा माध्यमातुन आम्ही काम करु शकलो. शिवसेनेचे नेते मा.आ. चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबार शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्याकडे १००० रेमडिसिव्हर मागणी केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारूड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी १००० रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले म्हणूनच आम्ही शेकडो रुग्णांचे जीव वाचवु शकलो याच्या आम्हाला मनस्वी समाधान आहे.

दुर्देवाने लोकप्रतिनीधी महणून सर्वांनाच जनेतेसाठी काम करावयाचे असतांना काही. लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांनी बेकायदेशीर रेमडीसीव्हीर आम्हाला दिलेत असा जाहीर आरोप वृत्तपत्राचा माध्यमातुन, सोशल मिडीयावरती करण्यात आला.

आमच्यामुळे मा.आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी राजेंद्रजी भारुड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांना काही प्रमाणात मानसिक तान झाला म्हणून दिलगीरी व्यक्त करतो. परंतु त्यांच्याच संहकार्याने आपण शेकडो नंदुरबार जिल्हयातील रुग्णांचे तसेच खापर, अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, दोंडाईचा, साक्री, नवापूर व नंदुरबार येथील हजारो रुग्णांना मदत केली.

प्रशासनाने रोटरी वेलनेस सेंटरला उसनवारी तत्वावर दिलेले १००० रेमडिसीव्हीर ईजेक्शन रोटरी वेलनेस सेंटरतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्याकडे सिव्हील हॉस्पीटलला जावुन केले.यावेळी रोटरी वेलनेस सेंटरचे संचालक ऍड. राम घुवंशी व विनय श्रॉफ उपस्थीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या