Sunday, April 27, 2025
Homeक्राईमप्रिंसिपल कॅबिनमध्येच विद्यार्थ्यी एकमेकांत भिडले; कॉलेजच्या प्राचार्यांनाही मारहाण

प्रिंसिपल कॅबिनमध्येच विद्यार्थ्यी एकमेकांत भिडले; कॉलेजच्या प्राचार्यांनाही मारहाण

नाशिकमधील नामांकित कॉलेजमधील प्रकार

नाशिक। प्रतिनिधी
महाविद्यालयातील प्राचार्यांच्या केबीनमध्ये शिरुन बापलेकांनी विद्यार्थ्यांसह कर्मचारी व महिला प्राचार्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड येथील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी नितीन कैलास देवडे (वय ३८) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित मयूर विजय बोराडे, विजय बोराडे याच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नितीन देवडे हे सदर कॉलेजमध्ये कार्यरत असून त्यांना एका क्लासरूममध्ये मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. ते त्या दिशेने गेले असता संशयित मयूर बोराडे व अभयसिंह चौहान यांच्यामध्ये भांडण झाल्याचे समजले. देवडे यांनी दोघांना वाद मिटविण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयात नेले. त्यावेळी मयूर बोराडे याचे वडील विजय बोराडे व अनोळखी व्यक्ती प्राचार्यांच्या कार्यालयात घुसले.

- Advertisement -

संशयितांनी त्यांच्या हातातील बेसबॉल स्टिक व लाकडी दांडक्यांनी देवडे व विद्यार्थी अभयसिंग चौहान यांना मारहाण करत शिविगाळ व दमदाटी केली. त्यानंतर संशयितांनी प्राचार्य डॉ. मंजुषा मुकुंद कुलकर्णी यांनाही मारहाण केली. याबाबत गुन्हा नोंद झाला असून तपास उपनगर पोलीस करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...