Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याडॉ. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

डॉ. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

पंचवटी । प्रतिनिधी

सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी (वय ४६) यांच्या रुग्णालयात अकाउंटींगचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने आर्थिक वादातून डॉ. कैलास राठी यांच्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

सदर घटनेबाबत डॉ. राठी यांच्या पत्नी रिना राठी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून रोहिणी दाते-मोरे व तिचा पती राजेंद्र चंद्रकांत मोरे यांच्यावर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. राठी शुक्रवारी (दि. २३) रोजी रात्रीनऊ वाजेच्या सुमारास रुग्णालयात संशयित मोरे याच्याशी बोलत असतांना मोरे याने डॉ. राठी यांच्या डोक्यावर व गळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या डॉ. राठी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेबाबत दिंडोरी नाक्यावरील विमलनाथ प्राईड येथे राहणाऱ्या डॉ. राठी यांच्या पत्नी डॉक्टर रीना राठी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात २०१८ मध्ये रोहिणी दाते-मोरे या रुग्णालयातील अकाउंट काम करतांना हिशोबात पाच ते सहा लाख रुपयांची तफावत आढळून आल्याने काम करणाऱ्या रोहिणी दाते-मोरे व स्वाती नाकडे यांना डॉ. राठी यांनी विचारणा केली असतारोहिणी दाते-मोरेने आर्थिक अडचण असल्याने पैसे घरगुती कामासाठी वापरल्याचे सांगितले.

या प्रकारानंतर रोहिणी दाते-मोरेला कामावरून काढले होते, तब्बल चार वर्षांनी दातेने पुन्हा डॉ. राठी यांची भेट घेतली, त्यावेळी तिला रुग्णालयात न ठेवता विविध ठिकाणी जमिनीशी निगडित कामांची जबाबदारी दिली होती, त्यावेळी दातेने डॉ. राठी यांचे कडून बारा लाख रक्कम घेत काम केले नव्हते. रोहिणी दाते-मोरे हिचा पती संशयित आरोपी राजेंद्र मोरे याला मे २०२२ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. याच काळात डॉ. राठी यांनी मोरे दाम्पत्याकडे असलेल्या १८ लाख रुपयांची मागणी केली, तेंव्हा वेळोवेळी देऊन पैसे परत करतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर ते पैसे देत नव्हते.

शुक्रवारी रात्री नऊ वाजता मोरे हा डॉ. राठी यांच्या रुग्णालयात बोलणीला येऊन त्यांच्या केबिनमध्ये आला. त्यावेळी राठी फोनवर बोलत असताना मोरे याने हातात कोयता काढून डॉ. राठी यांच्या डोक्यावर व गळ्यावर वार केले, डॉ. राठी घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, या हल्ल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली असता संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या