धुळे – प्रतिनिधी dhule
शेतकर्यांचे पांढरे सोने असलेल्या कपाशीला (Cotton) यंदा चांगला भाव असल्यामुळे त्यावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडलेली दिसत आहे. भदाणेसह दोंडाईचातून चोरट्यांनी दोन लाखांची कपाशी लंपास केली.
याबाबत पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या चोरीच्या घटनांमुळे शेतकर्यांमध्ये (farmer) भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे तालुक्यातील भदाणे येथील ज्योतीराम जोशा कर्नर (वय 45) यांच्या गाव शिवारातील शेट गट नं. 520 च्या पत्र्याच्या शेडमधून चोरट्यांनी 1 लाख 59 हजार 250 रूपये किंमतीची 20 क्विंटल कपाशी व 20 हजारांचे दोन टायर असा एकुण 1 लाख 79 हजार 230 रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला.
ही घटना दि.19 रोजी सायंकाळी 6 ते दि. 20 रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान घडली. याबाबत कर्नर यांनी धुळे तालुका पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय महादेव गुट्टे पुढील तपास करीत आहेत. तसेच दुसरी चोरीची घटना दोंडाईचात घडली.
शहरातील मांंडळ चौफुलीवरील केळोदे शॉपिंग सेंटरमधील दुकान फोडून चोरट्यांनी दीड क्विंटल कपाशी चोरून नेली. याबाबत शेतकरी अरूण रमेश धनर (वय 45 रा. गोपालपुरा, दोंडाईचा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तीन गोण्यांमध्ये भरलेला एकुण दीड क्विंटल कापुस चोरून नेला. त्यांची किंमत 15 हजार रूपये लावण्यात आली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ पवार करीत आहेत.