मुंबई | Mumbai
बांगलादेशात अराजकता (Bangladesh Violence) माजल्यानंतर भारताने या देशासह आपल्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात (Export of Agricultural Produce) थांबली आहे. अशातच आता भारत-बांग्लादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र
काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने (Central Government) परवानगी दिली होती. मात्र, भारत-बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे (Onion Export) ट्रक अडविल्यामुळे दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : बांगलादेशमध्ये आंदोलकांची धुडगूस, हिंसाचार, जाळपोळ सुरुच; अवामी लीगच्या २० नेत्यांची हत्या
दुसरीकडे नाशिकमधून (Nashik) दररोज कांद्याचे ७० ते ८० ट्रक बांगलादेशला रवाना होतात. परंतु, नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे ट्रक देखील भारत-बांगलादेश सीमेवर थांबल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच यामुळे कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबल्याने रोजचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत.
हे देखील वाचा : Manu Bhaker : दोन पदकांसह मनू भाकर भारतात परतली, ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत
दरम्यान, यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळण होत नसल्याने कांद्याची वाहतूक होत नाही, असे म्हटले आहे. तसेच बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करुन बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा