Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाParis Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र

Paris Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र

नवी दिल्ली | New Delhi

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेत ५० किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली होती. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय (Won) मिळवला होता. त्यामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र, अंतिम सामन्याआधीच फोगाटसह भारताला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून (Olympics) अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट ५० किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना (Wrestler) त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु, तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता विनेश फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

हे देखील वाचा : Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ५० किलो वजनी गटातून का खेळली?

दरम्यान,भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट, असल्याचे भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...