Saturday, July 27, 2024
Homeधुळेदुष्काळी स्थितीत रोहयोच्या विहिरींनीच तारले

दुष्काळी स्थितीत रोहयोच्या विहिरींनीच तारले

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

जिल्ह्यातील चारही तालुक्यात अत्यंत भयंकर अशी दुष्काळी परिस्थिती Drought conditions असतांना अडीच महिने लोटून देखील हे सरकार अद्याप दुष्काळ जाहीर करत नाहीत, मागणी करून मिळत नसेल तर प्रसंगी संघर्ष करू पण शिंदखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळी घोषित District declared drought करण्यास भाग पाडू, आज एवढया भयंकर दुष्काळी स्थितीत आमच्या काळात रोहयो मुळे झालेल्या 5 हजार सिंचन विहिरीचं तारणहार ठरत असून विकासाच्या गप्पा मारणारे कोणत्या बिळात लपले? असा सवाल माजी मंत्री आ. जयकुमार रावल Former Minister Aa. Jayakumar Rawal यांनी केला.

- Advertisement -

शिंदखेडा पंचायत समितीमध्ये महा आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेत सर्वोत्तम करणार्‍या ग्रामपंचायत आणि लाभार्थ्यांचा सत्कार आज आ. रावल यांच्या हस्ते झाला. यावेळी जि. प. उपाध्यक्षा कुसुमताई निकम, पं.स. सभापती वैशाली सोनवणे, उपसभापती नारायण गिरासे, कामराज निकम, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. आर. जी. खैरनार, नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, जि. प. सदस्य ज्योती बोरसे, विरेंद्रसिंग गिरासे, संजीवनी सिसोदे, पं.स. सदस्य प्रवीण मोरे, भगवान भिल, राजेश पाटील, दुल्लभ सोनवणे, चित्रकला भिल, राजेंद्र कोळी, रणजित गिरासे, जिजाबराव सोनवणे, प्रकाश देसले, उपनगराध्यक्ष भिला पाटील, सुरेश माळी, भरत पवार, साहेबराव गोसावी, प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी सोनवणे, देविदास बोरसे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी, नगरसेवक विनोद पाटील, जितेंद्र गिरासे, चेतन परमार, किसन सकट, राहुल कचवे, कंचनपुर सरपंच नेहरू पाटील, कुरकवाडे सरपंच प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान

प्रधानमंत्री आवास योजना प्रथम क्र. मालपूर ग्रा. पं., द्वितीय सुराय, तर तृतीय बेटावद, प्रधानमंत्री आवास योजना उत्कृष्ट लाभार्थी प्रथम संदीप रामराव माळी बाह्मणे, द्वितीय गोपीचंद चैत्राम पाटील धामणे, कैलास हिरामण माळी बेटावद, राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम ग्रा. पं. डांगुर्णे, द्वितीय मालपूर, तर तृतीय बेटावद राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल प्रथम वसंत तुकाराम महाले वरसुस, द्वितीय प्रियदर्शन काशीनाथ बागले बाह्मणे, तृतीय जिजाबाई भगवान अहिरे साळवे, सर्वोेत्कृष्ट क्लस्टर अभियंता सचिन पाटील, अभियंता श्याम पाटील यांचा आ. रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

आ. रावल पुढे म्हणाले की, गेल्या 5 वर्षात शिंदखेडा तालुक्यात एकही योजना अशी नव्हती जिचा लाभ शिंदखेडा मतदार संघात आला नाही. आमच्या सरकारने दरवर्षी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली. पण 2 वर्षात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असतांना साधा रुपया देखील नुकसान भरपाई मिळाली नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेचा निधीच मिळत आहे.

आज 2 वर्षे झाली जिल्ह्यातील एकही शेतकर्‍यांना साधी रोहयोची सिंचन विहीर देखिल मिळालेली नाही, मागील काळात शिंदखेडा तालुक्यातील मुख्य रस्ते, ग्रामीण रस्ते, सुलवाडे जामफळ योजना, अशी विविध कामे मंजूर केली होती. त्यातील काही कामे पूर्ण झाली असून काहींना अडविण्याचे काम या सरकारने केले आहे. जे विकासाच्या गप्पा मारत होते. आज त्यांचे सरकार आहे त्यांनी एक तरी योजनेचा लाभ आमच्या तालुक्यात आणावा, असे आवाहन देखील आ. रावल यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या