दुबई – Dubai
आयसीसीने सोमवारी वर्ल्डकप सुपर लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे. ३० जुलैला साउथम्पटन येथे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह या लीगला सुरुवात होईल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रस निर्माण करण्यासाठी आणलेली ही लीग २०२३ मध्ये भारतात होणार्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेची पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेतील पहिल्या सात संघांना विश्वकरंडक स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.
या लीगमध्ये १३ संघ सहभागी होत आहे. या संघात १२ पूर्ण सदस्य असून एक संघ नेदरलँडचा आहे, आयसीसी सुपर लीग २०१५-२०१७ चा विजेता म्हणून या संघाला स्थान देण्यात आले आहे.
आयसीसी क्रिकेट ऑॅपरेशन्सचे जनरल मॅनेजर ज्यॉङ्ग एलार्डाइस म्हणाले, ‘इंग्लंड आणि आयर्लंडपासून सुरू होणार्या आयसीसी पुरुष वर्ल्डकप सुपर लीगच्या प्रारंभामुळे आम्हाला ङ्गार आनंद झाला आहे. येत्या तीन महिन्यांत ही लीग एकदिवसीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.‘
यात प्रत्येक संघाला विजयासाठी १० गुण मिळतील. तर, बरोबरी आणि रद्द झालेल्या सामन्यांसाठी पाच गुण देण्यात येतील. पराभवासाठी कोणताही गुण दिले जाणार नाहीत. आठ मालिकांमधून मिळालेल्या गुणांच्या आधारे संघांची यादी केली जाईल. दोन किंवा अधिक संघांना समान गुण असल्यास ते निश्चित करण्यासाठी नियम लावले गेले आहेत.