Friday, April 25, 2025
Homeनाशिकनाट्यगृहे कथा अन् व्यथा : गंगापूररोड वसाहतीत नाट्यगृह कधी?

नाट्यगृहे कथा अन् व्यथा : गंगापूररोड वसाहतीत नाट्यगृह कधी?

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

नाटक ही एक लोकप्रिय आणि मानाची कला आहे. त्या कलेचा लाभ सर्व घटकातील रसिकांना मिळावा, यासाठी कॉलेजरोड, गंगापूररोडसारख्या (Gangapur Road) उच्चभ्रू भागात एकतरी चांगले नाट्यगृह असावे, ही सर्वांची इच्छा आहे. मात्र १३ वर्षांपूर्वी विद्यमान आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांनी नगरसेविका असताना त्यांनीच एकदा व्यक्त केलेली अद्ययावत नाट्यगृहाची इच्छाही अद्याप पूर्ण झालेली नाही.

- Advertisement -

नाशिकमध्ये महापालिकेचे (Nashik NMC) महाकवी कालिदास कलामंदिर सोडले तर परशुराम साईखेडकर नाट्यगृह, रावसाहेब थोरात सभागृह, गुरुदक्षिणा सभागृह हे शिक्षण संस्था व वाचनालयांचे आहेत. तेथे कार्यक्रम करण्यात काही मर्यादा निश्चितच आहेत. म्हणूनच महापालिकेचे एखादे नाट्यगृह असावे, ही येथील रसिकांची इच्छा आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आयुष्यात नाटकासाठी एक वेगळी जागा कोरली आहे.

वाढत्या लोकप्रियतेसोबत ही कला व्यवसाय म्हणूनही नावारूपाला आली आहे. व्यावसायिक नाटकांमधून कितीतरी कलाकारांचा उदरर्निवाह होतो. त्यासाठी किफायतशीर दरात नाट्यगृह उपलब्ध असेल तरच रसिकांना ते नाटक दाखवणे परवडते. प्रभागातील स्थानिक कलाकारांना (Artists) हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी सांस्कृतिक भवन गरजेचेच असते.

सभागृहामुळे (Auditorium) नवोदित कलाकारांना नाटक सादर करण्यासाठी सराव करण्याची संधी मिळू शकते. महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात जागेचा शोध घेऊन ते लवकरच पूर्णत्वास नेले तर कलावंतांना फायदाच होईल. राज्य सरकार व महापालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांकडे आर्थिक फायद्याची साधने म्हणून न पाहता प्रेक्षकांची गरज म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...