Sunday, April 27, 2025
Homeनाशिकटपाल कार्यालयात चोरट्यांचा डल्ला

टपाल कार्यालयात चोरट्यांचा डल्ला

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

नांदगाव शहरातील मुख्य चौकात असलेल्या भारतीय डाक विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडत चोरट्यांनीं १ लाख ५ हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे.

नांदगाव शहरातील मुख्य चौकात भारतीय डाक विभागाचे कार्यालय असून शनिवारी सकाळी या कार्यालयाचा दरवाजा उघडा दिसल्याने नागरीकांनी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे पो.ह.अनिल जाधव, धर्मराज अलगट पथकासह दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ पोलीसांना पाचारण करण्यात आले.

पोस्ट ऑफिसचे मास्तर धनराज गंगाराम सोनवणे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांत अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी भेट दिली.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...