Thursday, May 9, 2024
Homeनाशिकझेरॉक्स दुकानात धाडसी चोरी

झेरॉक्स दुकानात धाडसी चोरी

बोरगाव । लक्ष्मण पवार

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे माधव हिराजी बागुल यांचे झेरॉक्स दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे.

- Advertisement -

नेहमी प्रमाणे सकाळी टपरी उघडणे करिता गेले असता टपरीच्या उजव्या बाजूस बाहेर कागद पडलेले दिसले टपरीचा तर पत्रा कापलेला होता. टपरीच्या आतमध्ये झेरॉक्स मशीन ,कम्प्युटर सेट ,व इतर साहित्य दिसले नाही .व इतर साहित्य अस्ता व्यस्त पडलेले दिसले

सफेद रंगाचे झेरॉक्स ,सॅमसंग कंपनीचा मॉनिटर व इंटेक्स कंपनीचा सिपीयू ,कीबोर्ड, माउस , कॅम्प्युटर लॅमीनेशन मशीन, इप्सोन कंपनीचा कलर प्रिंटर डिजिटल निकॉन कंपनीचा कॅमेरा, ५००/रु रोख चोरट्यांनी टपरीचा पत्रा कापून आत प्रवेश करून चोरून नेला आहे.

या बाबत सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंद करून अधिक तपास सुरगाणा पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या