Tuesday, May 7, 2024
Homeजळगावचिंचोली परीसरात शेती साहित्य चोरीचे सत्र सुरूच

चिंचोली परीसरात शेती साहित्य चोरीचे सत्र सुरूच

चिंचोली, ता.यावल Yaval

गेल्या दोन दिवसांपूर्वीच चिंचोली परीसरात शेतक-यांचे (Agricultural pump) शेतीपंप व ट्युबवेल (Tubewell) वरील केबल चोरीच्या घटना घडल्या. परंतु केबल चोरीच्या पाठोपाठ आता शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील विद्युत उपकरणे (Electrical equipment) (स्टार्टर व ऑटो )आदी साहिंत्याची चोरीच्या घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

कासारखेडा शिवारातील येथील रहिवासी असलेले सलीम रज्जाक मन्यार व देविदास शामराव पाटील व राजेंद्र हिंमत पाटील यांच्या शेतात शेताच्या विहिरीवरील बंद पेटीतील स्टार्टर व विज नियंत्रित ठेवण्यासाठी बसविण्यात आलेले ऑटो आदि साहित्यांची अज्ञात चोरट्यांनी दि.४ शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वीच देविदास शामराव पाटील यांची विहिरीवरील केबलही चोरट्यांनी लांबविली होती आणि तिसऱ्याच दिवशी शेतातील बंद पेटीतील विहिरीवरील साहित्य लांबविले. याबाबत परीसरात शेतकरी बांधवांमधुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी परीसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परीसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या