Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याCabinet Expansion : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीसांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं

Cabinet Expansion : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीसांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा (Shinde-Fadnavis-Pawar Government) रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी (MLA) आतापासूनच आपआपल्या पद्धतीने फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे…

- Advertisement -

Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटलांनी सरकारपुढे ठेवल्या ‘या’ मागण्या

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात मुंबईत वर्षा निवासस्थानी तब्बल अडीच तास बैठक चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर मोठा खल झाल्याचे बोलले जात असून हा मंत्रिमंडळ विस्तार येत्या १६ किंवा १७ ऑक्टोबरला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. त्यामुळे यावरही शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Chhagan Bhujbal : “मला मोठं केलं ते…”; छगन भुजबळांचे जरांगे पाटलांना प्रत्युत्तर

तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर केंद्र सरकारमध्येही अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपदाची ( Cabinet Ministers) एक जागा दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून कोणाला मंत्रिपद मिळणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

Manoj Jarange Patil : “मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे…”; मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपमधील (BJP) काही नेत्यांना संधी मिळू शकते. तर दुसरीकडे अपक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्यासह शिंदे गटातील (Shinde Group) काही आमदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले असून यात शिंदे गटातील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांना संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे या विस्तारात मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Manoj Jarange Patil Sabha : जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेला तुफान गर्दी; संबोधनाकडे महाराष्ट्राचे लक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या