Friday, May 31, 2024
Homeजळगावचाळीसगाव पुरग्रस्तांना तातडीची मदत नाहीच

चाळीसगाव पुरग्रस्तांना तातडीची मदत नाहीच

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहरासह तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर हजारांच्या जनावरे वाहून गेली तर काही जनावरांचा जागेवरच मृत्यू झाल्याने पशुधन व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

- Advertisement -

आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी संकाळी चाळीसगाव शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकळी, रोकडे, रोहले तांडा या गावांना भेट देवून तेथील पूर परिस्थितीची पाहणी केली. या दौर्‍यात ना.जयंत पाटील हे पुरग्रस्तांना तातडीचे मदत जाहिर करुन त्यांचे आश्रु पुसण्याचे काम करतील, अशी अपेक्षा पुरग्रस्तांची होती. परंतू जयंत पाटील यांनी धावती पाहणी करुन, पुरग्रस्तांना शासकिय पंचनामे झाल्यानतंर मदत मिळणार असल्याचे सांगीतले. आता पुरग्रस्तांना शासकिय मदत मिळेपर्यंत त्यांनी कोणाकडे हात पसरावे आशी चर्चा तालुक्यातून व पुरग्रस्तांकडून होता आहे. तातडीची शासकिय मदत न मिळल्यामुळे नुकसानग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये शासनाविषयी तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून फक्त फोटोसेशनसाठी (Photosession) हा दौरा होता का? असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.

Video पंचनामे झाल्यानंतर पुरग्रस्तांना मदत-ना.जयंत पाटील

शहरासह तालुक्यात ३० ऑगस्ट, २०२१ रोजीच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. यात शहरासह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले होते. पुरात एक हजारांच्या वर जनावरे मृत पावलीत, तर शेकडो ऐकर शेतीचे नूकसान झाले आहे. अनेकांची पिके व घर संसार रात्रीतून पाण्यात वाहुन केले असून ते आजही अंगावरच्या कपड्यावर दिवस काढत आहेत.

पुराचा सर्वाधिक फटका वाघडू, वाकडी, खेर्डे आदि गावांना बसला आहे. नदीकाठची घरे वाहुन केल्याने लोक रस्त्यावर आले आहेत. उघड्यावर संसार असलेल्या लोकांना आज दोन वेळेच्या जेवण मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक सामाजिक संस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. आशात सर्व पक्षातील नेते मंडळी फक्त पुरग्रस्त भागाची पाहणी करुन, फोटोसेशन करुन आम्ही पुरग्रस्तांसाठी खूप काही केले असे जनतेच भासवत आहेत. तालुक्यातील मजरे, जावळे, वाघले, कोगानगर येथे अजुनही लाईट आलेले नाही.

राजकिय लोक फक्त सहाभुतीचे गाजर दाखवून पुरग्रस्तांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करीत आहेत. तालुक्यातील पुरग्रस्तांची अवस्थान ‘ ना रडता ये, ना बोलता ये ’ अशी झाली असताना, अचानक पाहणीसाठी आलेल्या ना.जयंत पाटील यांच्याकडुन पुरग्रस्तांना तातडीच्या आर्थिक मदतीची अपेक्षा होती. परंतू पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत मिळेल, ऐवढी घोषणा करुन ते माघारी परतले. पुरग्रस्तांना आता मदतीसाठी कागदी घोड्याची वाट पाहवी लागणार आहे. ते रंगल्यावर त्यांच्या जीवनात आर्थिक मदतीचा रंग भरला जाणार आहे. तोपर्यंत तितूर व डोगरी नदीला दुसरा पुर देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता फोटो सेशनसाठी कृपया कुणीही तालुक्यातील पुरग्रस्त भागात येवू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थ व बांधितांची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या