Saturday, July 6, 2024
Homeनाशिकसंपूर्ण नाशिक शहरात शनिवारी पाणीबाणी

संपूर्ण नाशिक शहरात शनिवारी पाणीबाणी

दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे आदी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मनपा क्षेत्रात शनिवार (दि. 25) रोजी दिवसभर तर रविवार (दि. 26) रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. अशी माहिती नाशिक मनपाच्या वतीने देण्यात आली आहे.

तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा वितरण विभागाद्वारे नाशिक पूर्व विभागात प्र.क्र. 15 मधील कामात 700 मी.मी व्यासाची मुख्य वाहिनी 500 मी. मी व्यासाची क्रॉस कनेक्शन करणे, प्र.क्र.30 मधील चढ्ढा पार्क जलकुंभा समोर मुख्य वाहीनी 700 मी.मी.व्यासाच्या व्हॉलचे लिकेज बंद करणे, पाथर्डी फाटा येथील 450 मी.मी व्यासाची पाईप लाईनवर व्हाल्व बदलणे तर नाशिक पश्चिम विभाग व नाशिकरोड विभागात देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.

पंचवटी विभागात प्र.क्र. 1 मधील राहु चौक मारुती मंदीराजवळील एअर व्हॉलचा पाईप बदलणे, आडगांव धात्रक फाटा हायवेलगत मदर तेरेसा जवळ पाईपलाईन दुरुस्ती करणे, तारवाला नगर तलाठी कॉलनी चौफुली जवळ 500 मी.मी. व्यासाची पाईपलाईन क्रॉस कनेक्शन करणे, स्मार्ट सिटी कामाअंतर्गत सुरु असलेले जलशुध्दीकरण केंद्र पंचवटी येथील पाईपलाईन शिफटींग व इतर अनुषंगीक कामे करण्यात येणार आहे.

तर सातपुर विभागात गंगापूर पंपिंग स्टेशन ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे जाणार्‍या रॉ वॉटर 1200मिमी पीएससी पाइप लाइन वर व्हाल्व बसविणे, प्रभाग क्र. 9 छत्रपती शिवाजी विद्यालय कार्बन नाका समोर असलेल्या 1200 मी मी पाइप लाइन वरील होत असलेली पाणी गळती बंद करणे, प्रभाग क्र. 9 शिवाजी नगर फिल्टर रोड, देवश्री इस्टेट अपार्टमेंट ला लगत असलेल्या 1200 मी मी पाइप लाइन वरील चालू असेलली पाणी गळती बंद करणे, प्रभाग क्र.8 बळवंत नगर नवीन जलकुंभ करिता 500 मीटर क्रॉस कनेक्शन करणयात येणार असून नवीन नाशिक विभागात अंबड स्मशान भुमीजवळ 800 मी. मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईनचे लिकेज बंद करण्याबरोबरच अंबड जलकुंभाजवळील 450 मी.मी. व्यासाचा व्हॉल दुरुस्ती करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या