Saturday, May 17, 2025
Homeजळगावजिल्ह्यातील या ४९ उमेदवारांना मिळणार सुरक्षारक्षक

जिल्ह्यातील या ४९ उमेदवारांना मिळणार सुरक्षारक्षक

जळगाव । प्रतिनिधी jalgaon
विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणार्‍या जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील 49 उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून एक शस्त्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात 11 मतदारसंघातील 49 उमेदवारांना अशा प्रकारची सुरक्षा उद्या दि.6 पासून पुरविली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ.रेड्डी यांनी सांगितले.

यांना मिळणार सुरक्षा
चोपडा-प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रभाकर सोनवणे, रावेर-अमोल जावळे, धनंजय चौधरी, अनिल चौधरी, दारा मोहम्मद, भुसावळ-डॉ.राजेश मानवतकर, जळगाव शहर-डॉ.अनुज पाटील, जयश्री महाजन, शैलजा सुरवाडे, राजूमामा भोळे, कुलभूषण पाटील, जळगाव ग्रामीण-गुलाबराव देवकर, मुकुंदा रोटे, अमळनेर-शिरीष हिरालाल चौधरी, डॉ.अनिल शिंदे, एरंडोल-डॉ.सतीश पाटील, अमोल चिमणराव पाटील, ए.टी.पाटील, चाळीसगाव-उन्मेश पाटील, मंगेश चव्हाण, पाचोरा- वैशाली सूर्यवंशी, सतीश बिर्‍हाडे, अमीत तडवी, प्रताप हरि पाटील, मांगो पगारे, अमोल शिंदे, अमोल शांताराम शिंदे, निळकंठ पाटील, मनोहर ससाणे, दिलीप वाघ, वैशाली किरण सूर्यवंशी, जामनेर-दिलीप खोडपे, मुक्ताईनगर-अनिल मोरे, अनिल गंगतीरे, अ‍ॅड.रोहीणी एकनाथ खडसे, अशोक जाधव, संजय ब्राम्हणे, अर्जुन पाटील, ईश्वर सपकाळे, उमाकांत मराठे, रोहीणी कवडे, रोहीणी खडसे, रोहीणीताई खडसे, चंद्रकांतभाऊ पाटील, चंद्रकांत पाटील, जफर अली मकसूद अली, विनोद सोनवणे आणि सुरेश तायडे यांना सुरक्षा पुरविली जाणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ज्योती

Who Is Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती मल्होत्राला कैथल...