Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' मोठे निर्णय

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

आता झाड तोडल्यास भरावा लागणार इतका दंड

मुंबई | Mumbai

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र

या बैठकीत १२ विविध निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी (Forest) महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आता यापुढे झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी १ हजार रुपयांचा दंड (Penalty) आकारला जात होता. या दंडाची तरतूद करणार शासन निर्णय लवकरच पारीत होईल.

हे देखील वाचा : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीला फटका; शेकडो ट्रक सीमेवरच अडकले

तसेच, पुढील आठवड्यात १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस (Independence Day) असल्याने ‘हर घर तिरंगा’मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीही, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तर ९ ऑगस्टपासून राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्यात येईल.

हे देखील वाचा : उध्दव ठाकरेंचा मोदी-शहांना सल्ला; ‘मोदी-शहांनी बांगलादेशात जावे’

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे

१) शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार

२) आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता

३) लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता

४) आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.

५) अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय

६) विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड

७) महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार

८) कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय ; आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय

९) न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घर कामगार, वाहनचालक सेवा

१०) सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट

११) जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य

१२) ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार.

१३) अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...