Thursday, May 16, 2024
Homeनगरदीड तोळ्याची चेन ओरबाडली

दीड तोळ्याची चेन ओरबाडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चाकूने वार करत गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना केडगाव उपनगरातील लिंक रोडवरील भूषणनगरमध्ये गुरूवारी पहाटे घडली. चोरट्यांच्या हल्ल्यात संतोष गौतम पाटील (वय 46) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

त्यांच्या पत्नी कविता पाटील यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील कुटुंब घरात झोपलेले असताना चार चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी पाटील दाम्पत्याला घरातील सर्व दागिने व रोख रक्कम काढून देण्याचे सांगितले.

दरम्यान कविता यांनी घराच्या गॅलरीत जाऊन आरडाओरडा केल्याने ते चोरटे निघून गेले. त्यांनी जाताना संतोष पाटील यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या