Sunday, May 26, 2024
Homeजळगावलग्नकार्याला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

लग्नकार्याला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

काकाच्या मुलाच्या लग्नासाठी (wedding) गेलेल्या तरुणाच्या घराचा (break house) कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी (Thieves) घरात प्रवेश केला. घरातून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 96 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी हनुमान नगरात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

खडसे, उध्दवांना महाजनी टोला
नवनवीन गोष्टी विकसित होण्यासाठी वाचन वाढवा- डॉ.मधुलिका सोनवणे

शहरातील हनुमान नगरात विशाल गोपाल पाटील (वय-36) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून विमा प्रतिनिधी म्हणून नोकरी करुन ते कुटुबांचा उदनिर्वाह करतात. विशाल पाटील यांच्या काकाच्या मुलीचे लग्न असल्याने ते लग्न समारंभासाठी दि. 1 मार्च रोजी दुपारी चार वाजता धरणगाव तालुक्यातील कोठळ येथे गेले होते.

त्यानंतर दि. 3 मार्च रोजी त्यांचे वडील गोपाल तुकाराम पाटील हे घराला कुलूप लावून लग्नाला आले होते. दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. 4 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारे त्यांचा मावस भाऊ योगेश माजन यांनी विशाल यांना फोन करुन तुमच्या घराचा आणि गेटचा कडीकोयंडा तुटलेला असून दोघ दरवाजे उघडे असल्याची सांगितले. तसेच घरात चोरी झाल्याचा प्रकार दिसतो असल्याचे त्यांने सांगितले.

बनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्‍याला दिड लाखांचा गंडापश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्द

चोरट्यांनी घरातील सामान फेकला अस्ताव्यस्त

माहिती मिळताच विशाल पाटील यांनी लागलीच घराकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजा आणि गेटचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. तसेच त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, बेडरुमधील गोदरजेचे कपाट उघडे दिसले आणि त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्याचप्रमाणे गोदरेजच्या कपाटातील तिजोरीतील चोरट्यांनी 9 हजारांची रोकड, 87 हजारांचे दागिने असा एकूण 96 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. याप्रकरणी विशाल पाटील यांनी लागलीच पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ अतुल वंजारी हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या