Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : मेडिकल चालक महिलेची पाेत ओरबाडली

Nashik Crime News : मेडिकल चालक महिलेची पाेत ओरबाडली

गाेळी आणि कॅडबरी खरेदीचा केला बहाणा, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

डाेकेदुखी बंद व्हावी, यासाठी गाेळी घेण्यासाठी मेडिकलमध्ये (Medical) जाण्याचा बहाणा करत दाेघा चेनस्नॅचरने मेडिकल मालक महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. ही घटना मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीदील गाेविंद नगर येथे (दि. ९) रात्री आठ वाजता घडली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पडताळून चाेरट्यांची ओळख पटविण्याचे काम पाेलिसांनी (Police) सुरु केले आहे.

हे देखील वाचा : Nahik News : इव्हेंटच्या कामासाठी आलेल्या युवकाचा पडल्यामुळे मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली सतिष अमृतकर (वय ४७, रा. चंद्रलाेक पार्क, गाेविंदनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीवरील २५ ते ३० वयाेगटातील दाेघा चेनस्नॅचरवर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. वैशाली यांचे प्रकाश पेट्राेल पंपाजवळ मेडिकल स्टाेअर्स असून त्या रात्री आठ वाजता मेडिकलमध्ये असतांना दाेघे संशयित दुचाकीवरुन मेडिकलच्या बाजूला येऊन थांबले. त्याचवेळी दुचाकीवरील एक संशयित उतरला व त्याने मेडिकल गाठले.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; सात महिन्यांत ‘इतके’ रुग्ण, तिघांचा मृत्यू

त्याने मेडिकलमधील वैशाली यांच्याकडे डाेके दुखीवरील उपचाराची गाेळी मागितली. ती गाेळी घेत असतानाच, दुसरा संशयित आजूबाजूच्या गर्दी व परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेता. याचवेळी गाेळी घेतल्यावर संशयिताने पुन्हा आजूबाजूची खात्री करत, पुन्हा मेडिकलमध्ये जाऊन कॅडबरीची मागणी केली. अमृतकर या कॅडबरी घेऊन येत असतानाच, संशयित चेनस्नॅचरने त्यांच्या गळ्यातील तीन ताेळे वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढून पळ काढला. भांबाववेल्या अमृतकर यांनी आरडाओरड केली असतानाच, मंगळसूत्र ओरबाडून पळालेला संशयित साथीदाराच्या दुचाकीवर बसून काही क्षणांत पसार झाला.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज मंजूर

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच, मुंबई नाका पाेलीस ठाण्याचे (Mumbai Naka Police Station) वरिष्ठ निरीक्षक संताेष नरुटे, उपनिरीक्षक गाेडे व डीबी पथक दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरील व अन्य भागातील सीसीटीव्ही फूटेज पडताळून पाहिले. तेव्हा चाेरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पळून जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, गाडीवरील नंबर, संशयितांचे चेहरे काेणत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, त्या विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. तपास उपनिरीक्षक गाेडे तपास करत आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या