Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमNashik Crime News : करंट बँक खात्यांना दुसरेच 'सीम' लिंक; दाेन काेटी...

Nashik Crime News : करंट बँक खात्यांना दुसरेच ‘सीम’ लिंक; दाेन काेटी रुपयांचे आर्थिक व्यवहार उघड

तपास सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करत त्यातून आर्थिक फायदा साध्य करुन घेण्यासाठी सा़यबर चाेरट्यांनी (Cyber ​​Criminals) आता नवनवीन फंडे वापरल्याचे पोलिस (Police) तपासात समोर येत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला असून फसवणूकीची रक्कम बँक खात्यात आणण्यासाठी भामट्यांनी बँक खात्यात चालू (करंट) खाते उघडून तसेच त्या खात्यांना वेगवेगळ्या व्यक्तींची सीमकार्ड लिंक करून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात सायबर चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : युवती आत्महत्याप्रकरणी संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

शहरातील एका सरकारी बँकेच्या व्यवस्थापकाने (Bank Manager) भामट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. भामट्यांनी २३ एप्रिल ते ६ ऑगस्ट या कालावधीत इंटरनेट, फोनचा वापर करून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन बँकेत चालू खाते उघडली. बँक चालू खाती उघडण्यासाठी भामट्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली. त्यासाठी भामट्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून ती त्यांचीच असल्याचे भासवले. मात्र भामट्यांनी सादर केलेले व्यवसाय अस्तित्वात नसल्याचे आढळून आले.

हे देखील वाचा : Nashik News : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मानवी साखळीचा आधार घेऊन काढावी लागतेय वाट

तसेच नव्याने सुरु केलेल्या बँक खात्यास (Bank Account) वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे घेतलेली मोबाइल क्रमांक जोडल्याचेही उघडकीस आले. दरम्यान, या चालू खात्यांमधून अल्पावधीत कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झाले. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या बँक खात्यांचा तपशिल तपासला असता हा प्रकार उघडकीस आला. सखोल तपासात या बँक खात्यांमधून २ कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे करंट खाते उघडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : “आदिवासी असल्यामुळेच माझ्यावर…”; ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतचा सरकारवर गंभीर आरोप

बँका धास्तावल्या

शेअर मार्केटमधून कमी कालावधीत जादा परतावा, कुरीअरमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत सीबीआय, ईडी कारवाईचा धाक दाखवणे किंवा इतर प्रकारे ऑनलाइनरित्या नागरिकांची फसवणूक केल्यानंतर भामटे या बँक खात्यांमध्ये नागरिकांकडील पैसे घेत असल्याचे उघड झाले आहेे. त्यामुळे आता बँकाही अलर्ट झाल्या असून अद्याप त्याचा रिझल्ट दिसून आलेला नाही. तर, बँकांची ऑनलाइन सुरक्षा भेदून हे चाेरटे तंत्रज्ञानाच्या मदतीने काेट्यवधी रुपयांचा फ्राॅड करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या