Saturday, November 16, 2024
Homeक्राईमCrime News : वडापाव पडला पाच लाखांना; ज्येष्ठाकडील दागिन्यांची पिशवी चोरट्यांनी लांबविली

Crime News : वडापाव पडला पाच लाखांना; ज्येष्ठाकडील दागिन्यांची पिशवी चोरट्यांनी लांबविली

पुणे | प्रतिनिधी | Pune

दागिन्यांची पिशवी (Jewelery Bag) दुचाकीच्या हँडलला लटकवून वडापाव (Vadapav) घेणे, एका ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला (Citizen) चांगलेच महागात पडले आहे. यादरम्यान, पाच लाख रुपयांचे दागिने ठेवलेली पिशवी अनोळखी चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना हडपसरमधील (Hadpasar) शेवाळेवाडी पीएमपी बसस्थानकाजवळ ही घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Nashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

याबाबत एका ज्येष्ठाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे दागिने उरळी कांचनमधील एका बँकेत तारण ठेवले होते. त्यांनी बँकेत तारण ठेवलेले दागिने कर्ज भरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर ते पत्नीसह दुचाकीवर मांजरीकडे निघाले. शेवाळेवाडी परिसरात त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पित्याकडून गतिमंद मुलीवर अत्याचार

यावेळी दागिन्यांची पिशवी दुचाकीच्या (Two-Wheelers) हँडलला अडकवून वडापाव घेण्यासाठी शेजारील उपहारगृहात गेले. नेमके त्याचवेळी चोरटय़ांनी महिलेची नजर चुकवून दागिन्यांची पिशवी चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत पांडुळे पुढील तपास करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या