Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik News : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीदरम्यान चोरट्यांची हातसफाई; लाखोंचा ऐवज लंपास

Nashik News : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीदरम्यान चोरट्यांची हातसफाई; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक | Nashik

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्यभरात काढलेल्या शांतता रॅलीचा समारोप झाला. या शांतता रॅलीच्या समारोपाच्या भाषणात जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे जरांगेंची ही शांतता रॅलीच्या समारोपाची सभा चांगलीच गाजली.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : विक्रेत्यास दीड काेटींचा गंडा; संशयितावर फसवणुकीचा गुन्हा

मात्र, जरांगेंच्या नाशिकमधील शांतता रॅलीदरम्यान चोरट्यांनी रॅलीत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले असून याप्रकरणी शहरातील पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ खून प्रकरणातील मुख्य मारेकऱ्यास अटक

याबाबत अधिक माहिती अशी की, जरांगेंच्या शांतता रॅलीत ज्ञानेश्वर कारभारी शिंदे (रा. वनसगाव, ता. निफाड) हे त्यांच्या सहकारी मित्रांसह आले असता, त्यांच्या गळ्यातील सोन्याची साडेचार तोळ्याची ९० हजार रुपयांची चैन गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच कृष्णा वामन टर्ले (६३, रा. हिरावाडी रोड) यांची ३ तोळ्याची ६० हजारांची चैन, ओमकार अशोक वाबळे (२१, रा. हिरावाडी) यांची ४६ हजारांची सोन्याची चैन आणि नानासाहेब आनंदराव मोरे (५०, रा. करंजवण, ता. दिंडोरी) यांची २० हजारांची सोन्याची चैन, सचिन शिवाजी थोरात (३२, रा. पाटपिंप्री, ता. सिन्नर) यांची १८ हजारांची सोन्याची चैन, सुनील भाऊसाहेब कदम (४५, रा. निपानी मळा, ओझर, ता. निफाड) यांची दोन तोळ्याची ४० हजारांची चैन, दिनकरराव पंडितराव भोसले (६७, रा. सारुळे, ता. निफाड) यांची ५० हजारांची अडीच तोळ्याची चैन, आशा बाळासाहेब चौधरी (४९, रा. ब्रीजनगर, जेलरोड) यांच्या गळ्यातील ३० हजारांची दीड तोळ्याची सोन्याची पोत असा ३ लाख ५४ हजार रुपयांचे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : नाशिकच्या पोलिसांचा गौरव; सात अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक

तसेच केशव पंढरीनाथ ढोली (५९, रा. वावरे नगर, कामटवाडा) यांची ३० हजारांची सोन्याची चैन, सौरभ देवचंद महाले यांची ६० हजारांची सोन्याची चैन, तर सीमा माधव पिंगळे यांची ६० हजारांची सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे.याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या