नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक मध्ये आज दोन खुणांच्या घटना ताज्या असताना आज नाशिकरोड येथील जेलरोड परिसरात वृद्ध मातेचा तिच्याच मुलाकडून गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान खून करणारा मुलगा स्वत: हून पोलिसांच्या स्वाधीन झाला असून कबुली दिली आहे.
रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अरविंद मुरलीधर पाटील, वय 58 वर्ष, राहणार शिवाजीनगर जेलरोड नाशिक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे येऊन सांगू लागले की, “मी आईच्या वृद्धापणाला कंटाळून तिचा गळा दाबून खून केला आहे. मला अटक करा. असे सांगू लागल्याने पोलीस पथक घटनास्थळी जाऊन खात्री करत असल्याचे समजते
या बाबत नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित मुलास ताब्यात घेतलेले आहे. दरम्यान घटनेबाबत सहायक आयुक्त सचिन बारी यांचे कडून माहिती घेतली असता ते सविस्तर माहिती घेत असल्याचे समजते.




