Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्या'काऊ हग डे' बद्दल सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

‘काऊ हग डे’ बद्दल सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | New Delhi

भारतात व्हॅलेंटाईन डे (valentine Day) म्हटला की, प्रत्येक वर्षी काही ना काही चर्चा होणारच, काहींना हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून स्वागतार्ह वाटतो, तर काहींना हा दिवस म्हणजे आपल्या संस्कृतीवरचा (Culture) घाला वाटतो. अशा एक न अनेक कारणांनी भारतातला व्हॅलेंटाईन डे गाजतोच.

- Advertisement -

यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ सुद्धा चर्चेत आला, त्याचे कारण ठरले केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे (Ministry) सचिव डॉ. एस. के. दत्ता यांनी एक पत्र काढून व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते यामुळे. या पत्रात दत्ता यांनी म्हटले होते की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते,’ म्हणून त्यांच्या तर्कानुसार या दिवशी गायीला मिठी मारून ‘काऊ हग डे’ (Cow Hug Day) साजरा करावा.

या पत्राचा देशातील जनतेने चांगलाच समाचार घेतला होता, काहींनी तर समाज माध्यमांमध्ये (Social media) या पत्राची टर उडवली होती, केंद्र सरकारच्या (Central Govt) या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. हे प्रकरण अंगलट येऊ पाहतेय याचा विचार करत अखेर केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय वन्यजीव संरक्षण (Wildlife Conservation) महामंडळाने तसे निर्देश दिले आहेत. या निर्णयाच्या घुमजाव मुळे आता लोकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला गायीला मिठी मारण्याची आवश्यकता राहिली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या