अमेरिकेत काही दिवसापूर्वी कृष्णवर्णीय माणसाच्या मृत्युनंतर अमेरिकेत सरकार विरोधात वातावरण पेटले होते. त्यातच अमेरिकन नौदलाने एका कृष्णवर्णीय महिलेचे आपल्या सैन्यात कृष्णवर्णीय महिलेचे पायलट म्हणून स्वागत केले आहे. अमेरिकन नौदलाने ट्विट करत याबाबतही दिली.
त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “इतिहास घडत आहे ! लेफ्टनंट जे. जी. मेडलाईन स्विगल ने नौसेना स्कूल मधून अभ्यास पूर्ण केला आहे. तिला या महिन्याच्या अखेर विंग्ज ऑफ गोल्ड हा बॅच भेटणार आहे.
- Advertisement -
तेथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितनुसार, स्विगल ही वर्जिनिया येथील बुर्केची रहिवासी आहे. तिने २०१७ मध्ये यूएस नेव्हल अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला होता. या आधी ४५ वर्षापूर्वी १९७४ मध्ये रोजमेरी मरिनर ही पहिली लढाऊ विमान उडवणारी महिला ठरली होती.