Sunday, September 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"NDA मध्ये आल्यास केंद्रीय मंत्रिपद देतो"; प्रकाश आंबेडकरांना 'या' नेत्याची मोठी ऑफर

“NDA मध्ये आल्यास केंद्रीय मंत्रिपद देतो”; प्रकाश आंबेडकरांना ‘या’ नेत्याची मोठी ऑफर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या बैठका होत असून उमेदवारांची आणि मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ११ उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे. रामदास आठवले आज नागपूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही ऑफर दिली.

हे देखील वाचा : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी बोलतांना आठवले म्हणाले की,”रिपब्लिकन पक्षाचा एकत्रीकरण एखाद्या गटाने (खोब्रागडे गटाने) करून होणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सोबत आणणे आवश्यक आहे. एवढ्या निवडणुका लढवूनही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. त्यांचे उमेदवार निवडून येत नाही. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय झालेले एकत्रीकरण समाजाला मान्य झाले नाही. प्रकाश आंबेडकर सोबत आले, तर त्या एकत्रीकरणासाठी मी तयार आहे. मला कुठलेही पद नको, प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो. वेळ आल्यास माझे मंत्रीपदही त्यांना देईन. फक्त त्यांनी एनडीएमध्ये यावे”, अशी ऑफर रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “मला तीन वेळेला मोदी सरकार (Modi Government) मध्ये मंत्रीपद मिळाले, कार्यकर्त्यांमुळे हे झाले. मला रिपब्लिकन पँथरच्या काळापासून नागपूर (Nagpur) आणि विदर्भाने भक्कम साथ दिली. सध्या ज्या सरकारमध्ये आहे, ते पाच वर्ष चालणारे सरकार असून पूर्ण बहुमत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत असून पुढे ही सोबत राहतील. पूर्वी ही असे सरकार चालले आहे”, असा विश्वास यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : लाकडाच्या भुकटीआड मद्यतस्करी; पाठलाग करुन वाहन पकडले

तसेच “मी आणि प्रकाश आंबेडकर सोबत आलो तर महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात बरेच काही घडू शकते. मी एकटा असल्याने दलितांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळत नाही. आम्ही दोघे एकत्रित आलो, तर ते होऊ शकेल. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सोबत आले पाहिजे. मी काही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलायला नको होते. त्यांनी रिपब्लिकन पक्ष चालवायला हवे होते. बहुजनांना एकत्रित करण्याच्या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय रिपब्लिकन ऐक्य शक्य होणार नाही”, असेही रामदास आठवले म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सोने चोरी करुन बंगालला पळणारा ताब्यात

आठवलेंनी महायुतीकडे विधानसभेसाठी केली १२ जागांची मागणी

आम्ही लोकसभेला महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या, मात्र त्या मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला १२ जागा द्याव्यात, यामध्ये विदर्भात किमान ४ जागा द्याव्यात. महाराष्ट्रात आम्ही १८ जागांची यादी केली असून त्यापैकी १२ जागा द्याव्यात. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजितदादा तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून प्रत्येकी ४-४-४ जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला १२ जागा मिळतील. तसेच येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्रीपद द्यावे आणि २ महामंडळे द्यावे अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या