Friday, November 15, 2024
Homeक्राईमNashik Crime News : लाकडाच्या भुकटीआड मद्यतस्करी; पाठलाग करुन वाहन पकडले

Nashik Crime News : लाकडाच्या भुकटीआड मद्यतस्करी; पाठलाग करुन वाहन पकडले

उत्पादन शुल्क विभागाची दहाव्या मैलावर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाकडी भुशाच्या गाेण्यांआड मद्याचे (Liquor) बाॅक्स लपवून दिव आणि दमन येथील विदेशी मद्याची तस्करी राेखण्यात यश आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने ओझर (Ozer) येथील येथील दहावा मैल परिसरात सापळा रचून कारवाई आरंभली, त्याचवेळी बाेलेराे चालकास संशय आल्याने त्याने गाडी न थांबविता भरधाव वेगात पुढे नेली. मात्र पथकाने पाठलाग करुन वाहनासह मद्य असा १८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणात संशयित परवेझ बच्चे खान (वय- ३८ रा. यशोधाम, ता. उमरगाम, जि. वलसाड, गुजरात) याला अटक (Arrested) केली आहे. 

- Advertisement -

हे देखील वाचा :  Nashik Crime News : तीन मुलांना विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न

भरारी पथक एकच्या दुय्यम निरीक्षक गणेश नागरगाेजे यांना अवैध मद्याची वाहतुक केली जाणार असल्याची माहिती समजताच त्यांनी (दि. २०) मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Aagra Highway) असलेल्या ओझर शिवारातील हॉटेल द किकर समोर सापळा रचला. तेव्हा वाहन तपासणी करतांना महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच १५ जेसी ४९६६) संशयास्पदरित्या मार्गस्थ हाेत हाेते. तेव्हा पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी चालकास वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने वाहनाचा स्पीड वाढवून पथकास चकवा देण्याचा प्रयत्न केला. यानंतर पथकातील अधिकारी आणि सेवकांनी बाेलेराेचा काही अंतरापर्यंत पाठलाग करुन अडविण्यात यश मिळविले.

हे देखील वाचा : Nashik News : परिवहन आयुक्तांसोबत आरटीओ कर्मचारी संघटनेची चर्चा फिस्कटली

दरम्यान, यानंतर वाहनाची (Vehicle) तपासणी केली असता, त्यातील पाठीमागील बाजूच्या ट्रॉलीमध्ये लाकडी भुश्याने भरलेल्या गोण्या आढळल्या. तर, यानंतर पथकाने लाकडी भुश्याआड तपासणी केली असता, त्याखाली दिव आणि दमण येथे विक्री करीता परवानगी असलेले परराज्यातील विदेशी मद्याचे बाँक्स आढळून आले. दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत कुणास माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ अथव व्हॉटस्अॅप तक्रार क्र. ८४२२००११३३ यावर माहिती कळवावी. नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे विभागाने कळविले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अटकेची भीती दाखवून फसवणूक

१८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्याची चाेरीछुपी वाहतूक आणि तस्करी विनाअडथळा सुरु असल्याचे कारवाईतून सिद्ध झाले असून सध्या पथकाने संशयित चालकासह या गुन्ह्यात मद्यसाठा घेणारा व पुरवठादार, जप्त वाहनाचा मालक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. कारवाईत विविध ब्रॅन्डचे दिव आणि दमन या केंद्रशासित प्रदेशात निर्मित आणि दादरा-नगर हवेली येथे विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे १०५ बॉक्स व बोलेरो पिकअप, लाकडी भुसा असा एकूण १८ लाख ६० हजारांचा प्रतिबंधित मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे, रोहित केरीपाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी. वाय. गायकवाड, जवान दिपक आव्हाड, संदीप देशमुख, विजेंद्र चव्हाण, सागर पवार, मुस्तफा तडवी, महिला जवान अनिता भांड यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या