Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयंदाही श्री मार्कंडेय पर्वतावरील यात्रेस मनाई

यंदाही श्री मार्कंडेय पर्वतावरील यात्रेस मनाई

पावसामुळे दरड कोसळण्याच्या शक्यतेने प्रशानाने घेतला निर्णय

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

कळवण तालुक्यातील श्री मार्कंडेश्वर पर्वतावर उद्या सोमवार दि. 26 रोजी सोमवती अमावास्येनिमित्त भरणार्‍या यात्रेला यंदाही प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पावसामुळे दरड कोसळण्याच्या शक्यतेने भाविकांना पर्वतावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कळवणचे उपविभागीय दंडाधिकारी अकुनुरी नरेश यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये हा आदेश जारी केला आहे.

- Advertisement -

2023 मध्ये सोमवती अमावास्येच्या दिवशी मार्कडेय पर्वतावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत 6 ते 7 भाविक जखमी झाले होते. त्यामुळे सोमवती अमावास्येनिमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्यासाठी व यात्रा भरविण्यावर गेल्या दोन वर्षांपासून बंदी घालण्यात येत आहे. पर्वतावर पहिल्या टप्प्याजवळ असणारा लोखंडी पूल अरुंद व कमकुवत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्वतावर जाण्यासाठी पायवाटाही निसरड्या आहेतः बारीतील रस्ता अरुंद असून, बारीमध्ये यात्रा लावण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे पुढील दुर्घटना टाळणेसाठी यात्रेला व मार्कड पर्वतावर मंदिरात जाण्यासाठी परवानगी देऊ नये, असा अभिप्राय तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी दिलेला होता.

YouTube video player

त्यानुसार प्रशासनाने सदर बंदी आदेश जारी केला आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच बाहेरच्या प्रांतातून हजारोंच्या संख्येने भाविक मार्कडेय ऋषी पर्वतावर दर्शनासाठी येत असतात. यापूर्वीही गर्दी तसेच अवघड वाटेमुळे भाविक पाय घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मार्कंड ऋषी पर्वतावर भाविकांची गर्दी होऊ नये, लोकांच्या जीवितास हानी होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी ’उपविभागीय दंडाधिकारी यांनी सदर निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Kopargav : कोपरगाव तहसीलच्या महिला महसूल सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav भ्रष्टाचाराने पोखरलेल्या महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजना पंडित...