Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनदबंग खानला 'रॉकी भाई'ची धमकी; जीवे मारण्याची सांगितली तारीख

दबंग खानला ‘रॉकी भाई’ची धमकी; जीवे मारण्याची सांगितली तारीख

मुंबई | Mumbai

अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्वरक्षणासाठी सलमानने खास बुलेटप्रुफ गाडी परदेशातून मागवली होती. मात्र आता सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत….

- Advertisement -

यावेळी देण्यात आलेल्या धमकीत हल्ल्याची तारीखदेखील सांगण्यात आली आहे. फोनद्वारे सलमानला ही धमकी देण्यात आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख ही रॉकी भाई, गौरक्षक जोधपूर राजस्थान अशी सांगितली आहे. सोमवारी रात्री ९ वाजता मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला.

सलमान खानला फोन करणाऱ्या व्यक्तीने तो ३० तारखेला त्याला मारणार असल्याचे सांगितले आहे. सलमान खानला आलेल्या हा धमकीचा कॉल १६ वर्षीय मुलाने केल्याची माहिती मिळत आहे.

शहापूर, ठाणे येथे या मुलाच्या कॉल प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हा मुलगा मुळचा राजस्थानला राहणारा आहे. त्याने हा कॉल का केला यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. “मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगून ठेवा” असे या मुलाने पोलिसांना कॉलवर सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या