Saturday, May 18, 2024
Homeजळगावअधीक्षक अभियंत्याला शिवीगाळ करत धमकी- विवेक ठाकरे विरुद्ध गुन्हा दाखल

अधीक्षक अभियंत्याला शिवीगाळ करत धमकी- विवेक ठाकरे विरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या लाभक्षेत्र विकास प्राधीकरणच्या (Beneficiary Area Development Authority) कार्यालयात जावून तेथील अधीक्षक अभियंता श्रीकांत दिलीपराव दळवी (Superintendent of Engineers Shrikant Diliprao Dalvi) वय 38 यांना शिवीगाळ तसेच धमकी (Threat) दिल्याची घटना गुरुवारी 1 वाजता घडली. याप्रकरणी विवेक ठाकरेसह पाच ते सहा जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी (वय 38) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार असे की, दळवी हे आज त्यांच्या कार्यालयात कामकाज करत असतांना दुपारी विवेक ठाकरे यांच्यासह पाच-सहा जण कार्यालयात आले. सेवानिवृत्त अभियंता एल. एम. शिंदे यांच्यासह इतरांनी अपहार केला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. त्यांना बेड्या ठोका अन्यथा बेमुदत आंदोलन करण्यासंदर्भात दळवी यांना निवेदन दिले.

दळवी यांनी ठाकरेंसह इतरांना सनदशील मार्गाने आंदोलन करा असे सांगितले, याचा राग आल्याने ठाकरेंसह इतरांनी दळवी यांना अश्लिल शिवीगाळ करुन कार्यालयात आरडाओरड करत गोंधळ घातला. या प्रकरणी दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ठाकरेसह पाच-सहा अनोळखी लोकांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभियंत्यांकडून अपमानास्पद वागणूकः ठाकरे

अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी यांना शांततेत निवेदन दिले. तरीदेखील दळवी यांनी कार्यालयातून हाकलून दिले. अपमानास्पद वागणुक दिली अशा आशयाची तक्रार ठाकरे यांच्यासह प्रमोद इंगळे, अनुप पानपाटील, सुनिल सोनवणे, खंडेराव महाले, शैलेश पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या